Video: तुम्ही कुठल्याही धर्माचे असा पण ओवेसींचे हे 5.23 सेकंदाचं भाषण आवडल्याशिवाय रहाणार नाही, ऐका, वाचा सविस्तर

AIMIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही आयेशाच्या मृत्यूवरुन तिच्या सासरच्या मंडळींना आणि मुस्लिम समाजातील अशा प्रवृत्तींना खडे बोल सुनावले आहेत.

Video: तुम्ही कुठल्याही धर्माचे असा पण ओवेसींचे हे 5.23 सेकंदाचं भाषण आवडल्याशिवाय रहाणार नाही, ऐका, वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 8:09 PM

मुंबई : पतीच्या छळाला कंटाळून आयेशा नावाच्या एका मुस्लिम तरुणीनं साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. आत्महत्या करण्यापूर्वी आयेशाने आपल्या फोनवर एक व्हिडीओ चित्रित केला. त्यातून तिच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती समोर आली. आयेशाच्या मृत्यूनंतर अनेकांनी संताप व्यक्त केलाय. AIMIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही आयेशाच्या मृत्यूवरुन तिच्या सासरच्या मंडळींना आणि मुस्लिम समाजातील अशा प्रवृत्तींना खडे बोल सुनावले आहेत.(Asaduddin Owaisi slammed the youth of all communities over Ayesha Khan’s suicide)

ओवेसी यांनी एका सार्वजनिक सभेतील भाषणात आयेशाच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं. “अहमदाबादेतील एका तरुणीनं आत्महत्या केल्याचा एक वेदनादायक व्हिडीओ समोर आला आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की हुंड्याचा मोह सोडा. तुम्ही पुरुष असला तरी पत्नीचा छळ करणं हा काही मर्दपणा नाही. बायकोला मारहाण करण्यात, बायकोकडे पैसै मागण्यात पुरुषार्थ नाही. तुम्ही असं काही करत असाल तर तुम्ही माणून म्हणून घेण्याच्याही लायकीचे नाहीत”, अशा शब्दात ओवेसी यांनी मुस्लिम धर्मियांसह समाजातील अशा प्रवृत्तींविरोधात संताप व्यक्त केला आहे.

अल्लाह तुमचं वाटोळं करो, ओवेसी संतापले

“नवऱ्याकडून होत असलेल्या अनन्वित अत्याचारामुळे तिनं टोकाचं पाऊल उचललं. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की अल्लाह तुमचं वाटोलं करो. मुलीच्या बापाचं दु:ख तुम्ही समजू शकत नाहीत. मला असे अनेक बाप माहिती आहेत. जे शेवटी माझा हात धरतात आणि मुलीच्या लग्नासाठी काही व्यवस्था करा, मरण्याआधी काही घडू द्या, अशी केविलवाणी मागणी करतात”, असंही ओवेसी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

अहमदाबादेत आयेशाबाबत नेमकं काय घडलं?

आयेशाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांना शेवटचा फोन केला होता. त्यावेळी आयेशा साबरमती नदीच्या किनारी उभी होती. तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. तिने हा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत तिने व्हिडीओत सांगितलं. आयेशाचे लग्न आरिफ नावाच्या युवकाशी झालं होतं. पण लग्नानंतर त्याने आयेशाच्या कुटुंबाकडून हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात केली. दीड लाख रुपये गोळा करुन आयेशाच्या वडिलांनी दिले. पण त्यानंतरही पैशांची मागणी सुरुच राहिली. आयेशाच्या वडिलांनी याबाबत तक्रार दाखल केली पण हे सर्व आयेशाला मान्य नव्हतं. तिचं आरिफवर खरं प्रेम होतं आणि ते तिच्या शेवटच्या व्हिडीओतून स्पष्ट होतंय.

पण लग्नानंतरही काही प्रेमकहाण्या अर्धवटच राहतात आणि आयेशाच्याबाबतीत तेच झाल्याची ती आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये सांगते. खेदाची बाब ही की अल्लाहकडे मुला पुन्हा माणसाचा जन्म देऊ नको अशी विनंती करतेय. म्हणजे तिला किती यातना सहन कराव्या लागल्या असलीत, हे तिच्या बोलण्यातून दिसतं. पण या सगळ्याला सामोरं जाण्याऐवजी आयेशाने आत्महत्येचा पर्याय निवडला.

शेवटच्या व्हिडीओत आयेशा काय म्हणाली?

“माझं नाव आयेशा आरिफ खान, मी जे काही करायला जातेय यात कुणाचाही दबाव नाही. मला माझ्या इच्छेनुसार हे करायचं आहे. असं म्हणा की देवानं मला इतकच जीवन दिलं आहे. … आणि प्रिय आई-बाबा, तुम्ही किती काळ लढाल. खटला संपवा. संघर्ष करण्याचा हेतू नाही. आरिफला स्वातंत्र्य हवं आहे. ठीक आहे, त्याने मोकळं व्हावं. आपलं जीवन एवढंच होतं. मला आरिफ आवडतो. मली आनंदी आहे की आता मला अल्लाहला भेटण्याची संधी मिळेल. त्यांना विचारले की माझ्याकडून कुठे चूक झाली. आई-वडील चांगले मिळाले. मित्र चांगले मिळाले. पण कुठेतरी कमी पडले, मी किंवा नशीब. आता अल्लाहला विनंती करेल की पुन्हा माणसाचं तोंड पाहायला मिळू नये. एक गोष्ट शिकले, प्रेम करत असाल तर दोन्ही बाजूंनी असावं, एकतर्फी कधी नसावं. चला, काही प्रेमकहाण्या लग्नानंतरही अर्धवट राहतात. हे प्रिय नदी, विनंती करते की मला तुझ्यात सामावून घे. माझ्या पाठीमागे काही होईल, त्यावरुन गोंधळ व्हायला नको. मी आज खूश आहे. कारण, मला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी होती ती मिळाली आणि ज्याला जे सांगायचं होतं ते सांगितलं. एवढं खूप आहे… अलविदा.”

इतर बातम्या :

पोलीसांनी कपडे काढायला लावले की ‘झगा’ काढून महिला उभी? जळगाव प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? वाचा सविस्तर

धक्कादायक! औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

Asaduddin Owaisi slammed the youth of all communities over Ayesha Khan’s suicide

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.