Video : गुजरातमध्ये स्थानिक निवडणूक निकालावेळी जोरदार राडा, पोलिसांचा लाठीचार्ज
गुजरातमध्ये दोन गटात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरु होती. घोषणाबाजीचं रुपांतर राड्यात झालं.
गांधीनगर : गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालात सुरुवातीच्या कलात भाजपने अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला आहे. अशावेळी गुजरातमध्ये दोन गटात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. आनंद जिल्ह्यातील बोरसद गावात दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरु होती. घोषणाबाजीचं रुपांतर राड्यात झालं. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अखेर लाठीमार करावा लागला. पोलिसांच्या लाठीमारामुळे लोकांमध्ये रोष पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधातच घोषणाबाजी केली.(Chaos in local elections in Gujarat, police baton charge)
सुरुवातीलाच्या कलात भाजप सर्वात मोठा पक्ष
गुजरातमध्ये पार पडलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप 81 नगरपालिकांमध्ये 54 जागी आघाडीवर आहे. काँग्रेसला 2 ठिकाणी आघाडी मिळाली आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आपनेही खातं उघडलं आहे. 31 जिल्हा परिषदांपैकी 12 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. तर 231 पंचायत समित्यांमध्ये भाजप 51 ठिकाणी आघाडीवर असल्याची माहिती मिळाली होती.
गेल्या आठवड्यात भाजपने अहमदाबाद, सूरत, राजकोट, वडोदरा, भावनगर आणि जामनगरमधील निवडणुकीत 576 जागांपैकी 483 जागांवर विजय मिळवला होता. तर आम आदमी पक्षानं सूरतमध्ये 27 जागांवर विजय संपादन केला आहे. तर काँग्रेसनं खातंही उघडलं नव्हतं.
सरासरी 60 टक्के मतदान
गुजरातमध्ये 81 नगरापालिका, 31 जिल्हा परिषद आणि 231 पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागला. या निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेस आणि आप असं चित्र पाहायला मिळालं. गेल्या रविवारी 28 फेब्रुवारी रोजी मतदार पार पडलं होतं. या निवडणुकीत 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. राज्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 81 नगरपालिकांसाठी 54.95 टक्के, 31 जिल्हा परिषदांसाठी 62.41 टक्के तर 231 पंचायत समित्यांसाठी 63.42 टक्के मतदान झालं. एसईसीने दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत सरासरी 60 टक्के मतदान झालं.
संबंधित बातम्या :
गुजरात निवडणुकीत आप आणि एमआयएमला लॉटरी, काँग्रेसचा पाय खोलात; भाजपने गड राखले
गुजरातमध्ये काँग्रेसचा पर्याय म्हणून ‘आप’कडे जनता?; भाजपची लाट कायम!
Chaos in local elections in Gujarat, police baton charge