Video : “ये भाई, जरा देख के चलो”, रोड सेफ्टीबाबत शंकर महादेवन यांचं खास गीत

रस्ते अपघाताबाबत जनजागृती करण्यासाठी 'ये भाई, जरा देख के चलो' हे नवं गीतही प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी हे गीत गायलं आहे.

Video : ये भाई, जरा देख के चलो, रोड सेफ्टीबाबत शंकर महादेवन यांचं खास गीत
रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करणारं गीत शकर महादेवन यांनी गायलं आहे.
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 7:04 PM

मुंबई : देशातील रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यात रस्त्यांच्या योग्य निर्मितीपासून ते लोकांच्या जनजागृतीपर्यंत अने महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून अनेक उपाययोजनाही केल्या जात आहेत. त्यात आता रस्ते अपघाताबाबत जनजागृती करण्यासाठी ‘ये भाई, जरा देख के चलो’ हे नवं गीतही प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी हे गीत गायलं आहे.(Special song sung by Shankar Mahadevan to create awareness about road accidents)

नितीन गडकरी यांनी स्वत: ट्वीट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. “ये भाई, जरा देख के चलो, शंकर महादेवन यांनी रस्ता सुरक्षेचं अॅन्थम गायलं आहे. आपणा सर्वांना शिकायचं आहे, जेणेकरुन एक दिवस आपण झिरो रोड अॅक्सिडेन्टपर्यंत पोहोचू शकू”, असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केलं आहे.

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार

रस्ते अपघात ही भारतातील एक गंभीर समस्या आहे. यामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. सध्याच्या आकडेवारीनुसार देशात प्रत्येक दिवशी रस्ते अपघातात 415 लोकांचा मृत्यू होतो. 2030 पर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर भारतात रस्ते अपघातांमुळे 6.7 लाख लोकांचा मृत्यू झालेला असेल, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय.

त्यामुळे आगामी काळात रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक धोरण आखले आहे. त्यानुसार 2025 पर्यंत रस्ते अपघातांचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे गडकरी यांनी सांगितलं होतं.

इतर बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधानांना शोधण्यासाठी बंगालला जावं काय? काँग्रेस नेत्याने प्रश्न विचारताच मोदी लोकसभेत हजर!

जीवाजी विद्यापीठ परिसरात शिक्षक आणि कर्मचारी पाहत होते पॉर्न, 2 महिलांचाही समावेश!

Special song sung by Shankar Mahadevan to create awareness about road accidents

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.