video : बांधकाम सुरु असलेला नदीवरील पुल क्षणाधार्त धाराशाही, कुठे झाला अपघात पाहा
पुलाची अशी वाताहत झाल्याने त्याच्या बांधकामाचा दर्जा विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी याच पुलाचा काही भाग कोसळला होता.
पाटणा : बिहारमधील भागलपूरमध्ये गंगा नदीवर बांधकाम सुरू असलेला पुल क्षणात जमीनदोस्त झाल्याने खळबळ उडाली आहे. या पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात होते. या वर्षअखेर तो तयार होणार होता. परंतू रविवारी अचानक हा पुल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे नदीच्या पात्रात विसावला. सुदैवाने या पुलाच्या कोसळल्याने कोणीही जखमी झालेले नाही, मात्र त्याच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पुलाच्या कोसळण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
खगडीया-अगुवानी- सुल्तानगंज गंगानदीवर सुरु असलेल्या या पुलाचे भूमिपूजन चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले होते. भागलपूरच्या सुल्तानगंज येथे तयार होणाऱ्या या पुलाने खगडीया आणि भागलपुर मधील अंतर कमी होणार होते. या पुलाच्या बांधकामासाठी 1717 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. गंगा नदीवरील या पुलाच्या कोसळण्या मागचे कारण समजू शकलेले नाही. व्हिडीओमध्ये या पुलाचे सुपर स्ट्रक्चर कोसळताना स्पष्ट दिसत आहे. पुलाच्या तीन पिलरवरील स्ट्रक्चर आज कोसळले. पुलाची अशी वाताहत झाल्याने त्याच्या बांधकामाचा दर्जा विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी याच पुलाचा काही भाग कोसळला होता.
हा पाहा व्हिडीओ…
#Bihar a portion of under construction bridge over Ganga river collapsed today. The Aguanhighat Sultanganj bridge will connect Khagaria and Bhagalpur districts. pic.twitter.com/7DLTQszso7
— All India Radio News (@airnewsalerts) June 4, 2023
नोव्हेंबर – डिसेंबरात तयार होणार होता
हा पुल कोसळल्याची घटना दुर्दैवी असल्याचे जेडीयू आमदार ललित मंडल यांनी म्हटले आहे. या पुलाचे काम नोव्हेंबर – डीसेंबर महिन्यात पू्र्ण होणार होते. परंतू त्याआधीचा त्याचा मोठा भाग कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. जर पुलाच्या निर्मिती भ्रष्टाचार झाला असेल तरी दोषींवर कारवाई केली जाईल. हा पूल का कोसळला याचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.