वाराणसी : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या 7 व्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज वाराणसीमध्ये प्रचंड मोठा रोड शो केला. या रोड शोला भाजप कार्यकर्ते आणि मोदींच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. रोड शो नंतर पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात(Kashi Vishwanath Temple) दर्शन घेतलं. यावेळी पंतप्रधान मोदींचा खास अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी डमरू वाजवला.
काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी काशी विश्वनाथाच्या मंदिरात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचं स्वागत पुजाऱ्यांना डमरू वाजवून केलं. मंदिराच्या बाहेर मोदींनी पुजाऱ्यांच्या हातून डमरू घेत स्वत: वाजवलं. पंतप्रधान मोदींचे डमरू वाजवतानाचे व्हिडीओ आणि फोटो आता चांगलेच व्हायरल होत आहेत. पंतप्रधान मोदींचं हे रुप यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळालं आहे. मोदी सातत्याने अशा प्रकारच्या बातम्यांमधून चर्चेत असतात.
#WATCH | PM Modi tries his hand at ‘damru’ at Kashi Vishwanath Temple in Varanasi, post his roadshow ahead of the last phase of #UttarPradeshElections2022 pic.twitter.com/N7HaEtlETx
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 4, 2022
PM Narendra Modi’s roadshow draws large crowds as he campaigns for the last phase of Uttar Pradesh Assembly elections, in Varanasi. pic.twitter.com/dNBWvUjxSo
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 4, 2022
पंतप्रधान मोदी हे ज्या राज्यात जातात, जिथे सभा किंवा रॅली करतात तेखील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी प्रादेशिक भाषेत संवाद साधतात. गुजरातमध्ये गुजराती, महाराष्ट्रात मराठी, कर्नाटकात कानडी भाषेत आपल्या भाषणाची सुरुवात करतात. तसंच तेथिल महान पुरुषांना अभिवादन करतात. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी आपण गेलेल्या भागातील परंपरा जपण्याचाही प्रयत्न करतात. त्याचाच भाग म्हणून ते विविध पेहराव, टोपी घातलेले आणि विविध प्रकारची वाद्य वाजवताना पाहायला मिळतात. जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदी त्रिपुरा आणि मणिपूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळीही मोदींनी त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवली होती. त्यावेळी मोदींनीही कलाकारांमध्ये जाऊन ढोल वाजवला होता.
इतर बातम्या :