Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय दिवस स्पेशल : 49 वर्षांपासून ‘जिवंत शहीद’, पाकच्या जेलमध्ये बंद Missing 54 कोण आहेत?

शिमला कराराद्वारे 93 हजार सैनिकांना भारताने सन्मानासह त्यांच्या देशात पाठवलं, पण हीच कृती पाकने केली नाही.

विजय दिवस स्पेशल : 49 वर्षांपासून 'जिवंत शहीद', पाकच्या जेलमध्ये बंद Missing 54 कोण आहेत?
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 1:59 PM

मुंबई : 16 डिसेंबर 1971… तीच तारीख, ज्या दिवशी भारताने पाकिस्तानला फक्त धूळच चारली नाही, तर त्याचे 2 तुकडे केले. एक आजचा पाकिस्तान आणि दुसरा बांगलादेश. या युद्धात पाकच्या तब्बल 93 हजार सैनिकांनी भारताच्या वीरांपुढे हत्यारं टाकत शरणागती पत्कारली. भारताने या सैनिकांना मोठ्या मनाने माफ केलं आणि त्यांना पुन्हा त्यांच्या देशात धाडलं. पण, हीच कृती पाकिस्तानकडून झाली नाही, नेहमी शेपटी वाकडीच ठेवणाऱ्या पाकने भारताचे 54 सैनिक गायब झाल्याचं सांगितलं. ज्यांचा या युद्धानंतर कधीच थांगपत्ता लागला नाही. आणि याच सैनिकांना म्हटलं जातं Missing 54.. (Vijay Divas Special Report on Missing 54 in 1971 War)

आर्मीचे 30 तर हवाई दलाचे 24 सैनिक बेपत्ता!

1971 च्या भारत पाक युद्धात जे 54 सैनिक गायब झाले, ते गायब झाले किंवा युद्धात शहीद झाल्याचं घोषित करण्यात आलं. असं मानलं जातं की हे सैनिक आजही जिवंत आहेत आणि पाकने त्यांना वेगवेगळ्या काळकोठड्यामध्ये बंद केलं आहे. या 54 सैनिकांमध्ये 30 आर्मीचे तर 24 हवाई दलाचे जवान होते. वेस्टर्न फ्रंटवर लढताना या सैनिकांना पाक सैन्याने अटक केली होती.

शरणागती पत्कारलेल्या 93 हजार पाक सैन्याची भारताकडून सुटका!

1971 च्या युद्धात भारताने पाकला मातीमोल केलं. पाकला शरणागती पत्करण्याशिवाय काहीही शिल्लक ठेवलं नाही. तब्बल 93 हजार सैनिकांनी आपल्या बंदुका भारतासमोर टाकल्या. त्यानंतर शिमला करार करण्यात आला, ज्या कराराद्वारे या 93 हजार सैनिकांना भारताने सन्मानासह पुन्हा त्यांच्या देशात पाठवलं. पण हीच कृती पाकने केली नाही.

कंवलजीत यांच्या पत्राने पाक जगासमोर उघडा!

यातील अशीच एक कहाणी आहे, मेजर कंवलजीत सिंह यांची. मेजर कंवलजीत सिंह असे एकमेव सैन्यअधिकारी होते, जे आपल्या एका हातासह युद्धात लढले. असं म्हटलं जातं की कंवलजीत सिंह नसते तर आज पंजाबचा फिरोजपूर हा भाग पाकिस्तानात असता. कंवलजीत यांची पत्नी आजही त्यांची वाट पाहत आहे. गायब झाल्याच्या 12 वर्षांनंतर त्यांना कंवलजीत सिंह यांनी एक पत्र लिहिलं, ज्यात मेजर कंवलजीत यांनी पाकिस्तानातील जेलमध्ये बंद असल्याचं सांगितलं. शिवाय आपल्यावरील अत्याचाराचंही कथन केलं होतं.

मेजर अशोक सुरींचीही ह्रदयद्रावक कहाणी

यातील दुसरी कहाणी आहे मेजर अशोक सुरी यांची. अशोक सुरींनी 1974 मध्ये पत्र लिहून जिवंत असल्याचं कुटुंबाला कळवलं. मात्र, तोपर्यंत सैन्यानं त्यांना शहीद घोषित केलं होतं. याशिवाय 1975 मध्ये आलेल्या एका पत्रात 20 भारतीय सैनिक जिवंत असल्याचं लिहिण्यात आलं होतं. ज्यांच्यावर पाकिस्तानातल्या जेलमध्ये अत्याचार होतात असं लिहिण्यात आलं होतं.

पाकच्या रेडिओवर जिवंत असल्याची घोषणा, मात्र नंतर गायब

यातील तिसरी कहाणी आहे विंग कमांडर एच. एस. गिल यांची… गिल यांनी हायस्पीड म्हटलं जायचं. भारत-पाक युद्धात गिल यांचं विमान पाकिस्तानात पडलं, आणि त्यांना जिवंत पकडण्यात आलं. पाकिस्तानच्या रेडिओवर याची घोषणाही झाली. मात्र, त्यानंतर ते गायब झाल्याचं पाककडून सांगण्यात आलं. विशेष म्हणजे, 18 वर्षांनंतर पाकिस्तानच्या जेलमधून सुटलेल्या एका स्मगलरने गिल जिवंत असल्याचा खुलासा केला होता. (Vijay Divas Special Report on Missing 54 in 1971 War)

बेपत्ता सैनिकांच्या कुटुंबाचे शर्थीचे प्रयत्न अयशस्वी

या सैनिकांना सोडवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने दिवसाची रात्र केली. सरकारपासून ते संयुक्त राष्ट्रापर्यंत सगळ्यांकडे तक्रारी केल्या. पाकिस्तानातल्या जेलमध्येही भेटी दिल्या. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. 2015 साली सर्वोच्च न्यायालयात सरकारने सांगितलं की, आम्ही मानतो की हे सगळे सैनिक शहीद झाले आहेत. जेलमध्ये हे सैनिक बंद असल्याच्या दाव्याला पाकने फेटाळलं.

बेनझीर भुट्टोंकडून भारतीय सैनिकांना बंदी केल्याचं मान्य

भारतीय सैनिकांना कैद करुन ठेवल्याचं पाक वेळोवेळी फेटाळत आला आहे. मात्र बेनझीर भुट्टो ज्यावेळी पाकच्या पंतप्रधान झाल्या, त्यावेळी त्यांनी भारतीय सैनिक पाकच्या विविध जेलमध्ये बंद असल्याचं मान्यही केलं. मात्र, सत्तेच्या दोऱ्या कायम हातात ठेवणाऱ्या पाक सैन्याने त्यांचा हा दावा फेटाळला. त्यामुळे या सैनिकांच्या सुटकेचा मार्ग पुन्हा बंद झाला.

संबंधित बातम्या :

1971च्या भारत-पाक युद्धातील हा किस्सा माहिती आहे का?

(Vijay Divas Special Report on Missing 54 in 1971 War)

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.