Chandrayaan 2 : चंद्रापासून अवघं 2.1 किमी अंतर, विक्रम लँडर संपर्काबाहेर

विक्रम लँडरने 30 किलोमीटर अंतरावरुन चंद्राच्या दिशेने कूच करताना 'रफ ब्रेकिंग फेस' या अडथळ्यावरही मात केली. मात्र चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना 'विक्रम'चा इस्रोच्या ग्राऊण्ड स्टेशनशी संपर्क तुटला. 

Chandrayaan 2 : चंद्रापासून अवघं 2.1 किमी अंतर, विक्रम लँडर संपर्काबाहेर
Follow us
| Updated on: Sep 07, 2019 | 10:57 AM

Mission Chandrayaan-2 बंगळुरु : भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान 2’ (Chandrayan 2) मोहिमेला धक्का बसला आहे. चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडर संपर्काबाहेर (Vikram lander connection lost) गेलं. चंद्रयान 2 मोहिमेत सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अखेरच्या 15 मिनिटांत ‘इस्रो’ आणि ‘विक्रम’ लँडर यांचा संपर्क तुटला. आता सर्व मदार चंद्राच्या कक्षेत असलेल्या ‘चंद्रयान 2’च्या ऑर्बिटरवर आहे.

‘चंद्रयान 2’ सात सप्टेंबर 2019 च्या मध्यरात्री एक वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग (Soft Landing on Lunar Surface) करणार होतं. 30 किलोमीटर अंतरावर स्थिरावलेल्या लँडरने चंद्राच्या दिशेने कूच करताना ‘रफ ब्रेकिंग फेस’ (Rough Breaking Phase) या अडथळ्यावरही मात केली. मात्र चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना ‘विक्रम’चा इस्रोच्या ग्राऊण्ड स्टेशनशी संपर्क तुटला.

‘चंद्रयान 2’चा ऑर्बिटर 100 किलोमीटर अंतरावर असून आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. चंद्राभोवती फेऱ्या घालून ऑर्बिटरही बरीचशी माहिती गोळा करणार आहे.

थरारक 15 मिनिटं

यावेळी ‘इस्रो’मध्ये उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांसह घरबसल्या या क्षणाचं लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्यांनीही श्वास रोखून धरला होता. पण अचानक एका क्षणी इस्रोच्या नियंत्रण कक्षात शांतता पसरली. इस्रोचे प्रमुख के शिवन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ लँडरशी संपर्क तुटल्याची माहिती दिली आणि ते पुन्हा नियंत्रण कक्षात आले.

काही वेळातच इस्रोने कंट्रोल रुममधून आपलं थेट प्रक्षेपणही बंद केलं. त्यानंतर काही वेळातच विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याची (Vikram lander connection lost) अधिकृत घोषणा करण्यात आली.

चंद्रयान 2 मोहिम यशस्वी होण्यासाठी 20-20 तास काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला. परंतु इस्रोने अजूनही अपेक्षा सोडलेली नाही. कारण, आकडेवारीचं विश्लेषण सध्या केलं जात असून लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे. चमत्कारिकरित्या विक्रम लँडरशी संपर्क झाल्यास भारताच्या नावावर नव्या इतिहासाची नोंद होईल.

चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा रशिया, यूएस आणि चीननंतर चौथा देश ठरणार आहे. मात्र आजवर कधीही समोर न आलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचं मिशन आखणारा भारत हा एकमेव देश आहे.

मोदींकडून शास्त्रज्ञांचं कौतुक

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अहोरात्र परिश्रम केले. पण चंद्रावर उतरण्यापूर्वीच विक्रम लँडरशी संपर्क तुटला आणि यामुळे सर्व शास्त्रज्ञांसाठीही हा मोठा धक्का होता. पण या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना बळ देण्याचं काम केलं.

के शिवन यांनी माहिती दिल्यानंतर पंतप्रधान मोदी नियंत्रण कक्षात आले आणि शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. तुमच्या कामाचा देशाला अभिमान असून तुम्ही मोठं योगदान दिलं आहे. माझ्यासह संपूर्ण देश तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. फक्त धीर सोडू नका, कारण आपला प्रवास पुढेही असाच सुरु राहणार आहे, असं म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.

चंद्रयान 2 चा प्रवास

इस्रो’चं महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-2’ 22 जुलै रोजी अवकाशात झेपावलं होतं. 20 ऑगस्टला ‘चंद्रयान-2’ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. लँडर ‘विक्रम’ 2 सप्टेंबरला ऑर्बिटरपासून विलग झाला. ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत राहणार असून लँडर ‘विक्रम’ हा पृष्ठभागावर उतरेल. तर रोव्हर ‘प्रज्ञान’ मात्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर फिरत संशोधन करेल.

चंद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे.’चंद्रयान-2′ सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केला आहे. चंद्रावर उतरण्यासाठी चांद्रयान 2 ला जवळपास 55 दिवसांचा कालावधी लागला. 978 कोटी रुपये खर्च करुन केलेलं हे मानवविरहित मिशन आहे. भारताची ही दुसरी चंद्रावरील स्वारी आहे. भारताने 2008 मध्ये चांद्रयान 1 चं प्रक्षेपण केलं होतं.

संबंधित बातम्या

चंद्रयान 2 : यश मिळालं तर आपलं, अपयश आलं तरीही आपलंच, इस्रोच्या 2 रॉकेट वुमनचा देशाला अभिमान

‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा

Chandrayaan-2 चंद्राच्या उंबरठ्यावर, मध्यरात्री ‘चंद्रयान 2’चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, भारत ‘विक्रम’ रचणार

Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार

Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं 

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.