विनेश फोगाट, इल्तिजा मुफ्ती ते उमर अब्दुल्ला, निवडणुकीच्या मैदानात दिग्गजांना धक्का? मत मोजणीतील धक्कादायक 5 ट्रेंड

Assembly Election Result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. थोड्याच वेळात सर्व चित्र स्पष्ट होईल. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर दोन्ही राज्याच्या एक्झिट पोलचे निकाल आता चुकीचे ठरत असल्याचे समोर येत आहेत. त्यात या दिग्गजांची स्थिती काय आहे?

विनेश फोगाट, इल्तिजा मुफ्ती ते उमर अब्दुल्ला, निवडणुकीच्या मैदानात दिग्गजांना धक्का? मत मोजणीतील धक्कादायक 5 ट्रेंड
कोण मारणार बाजी?
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 11:49 AM

Haryana, Jammu And Kashmir विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. थोड्याच वेळात या दोन्ही राज्यातील निकालांचे चित्र स्पष्ट होईल. सत्ता कुणाच्या हाती आली हे स्पष्ट होईल. सकाळनंतर आता दुपारच्या अंदाजानुसार, हरियाणात भाजपाने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या पारड्यात बहुमताचा आकडा गेला आहे. एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरल्याचे समोर येत आहे. त्यातच या राज्यातील काही दिग्गजांचे नशीब काय असेल, ते पराभवाच्या छायेच आहेत का याचाही अंदाज समोर आला आहे. या अंदाजामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील धक्कादायक 5 ट्रेंडस

१. काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट जुलाना मतदारसंघात पिछाडीवर

हे सुद्धा वाचा

२. पीडीपी प्रमुख महबुबा मुफ्तीची मुलगी इल्तिजा बिजबेहरा पिछाडीवर, तीने पराभव स्वीकारला आहे.

३. उमर अब्दुल्ला हे गांदरबल मतदारसंघात पिछाडीवर

४. गोपाल कांडा हरियाणातील सिरसा जागेवर आगेकूच करण्यात अपयशी

५. दुष्यंत चौटाला यांना उचाना मतदारसंघात सूर गवसला नाही

६. हरियाणात सध्या भाजप 46 जागांवर आघाडीवर

भाजपने डाव पलटवला

निवडणूक आयोगानुसार, सध्याच्या अंदाजानुसार हरियाणात भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने 36 जागांवर आगेकूच केली आहे. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस एनसी आघाडीने 47 जागांवर करिष्मा दाखवला आहे. भाजप येथे 28 मतदारसंघात आघाडीवर आहे. तर पीडीपी 3, आणि इतर 10 जागांवर पुढे आहेत. इकडे हरियाणात भाजपने राहुल गांधी यांच्या जिलेबी विधानावरून चिमटे काढायला सुरूवात केली आहे. दुपारपर्यंत निकालाचे चित्र पालटल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता 70 हत्तींचे बळ आले आहे. त्यांची नकली जिलेबी बाहेर आल्याचा टोला भाजप पदाधिकाऱ्यांनी लगावला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये होऊ शकतो चमत्कार?

हरियाणात पराभवाच्या छायेत असलेली भाजपा आता बहुमताच्या सावलीत आलेली दिसते. त्यामुळे हरियाणात भाजप नेत्याचा जीव भांड्यात पडला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी निराशा झटकून ढोल हाती घेतला आहे. तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये पण भाजप चमत्कार घडवू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. येथे भाजप 23 जागांवर पुढे तर काँग्रेस आघाडी 49 जागांवर आघाडीवर आहे.

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.