Violence in Bengal : ममता बॅनर्जी आणि राज्यपाल पुन्हा आमनेसामने, प्रोटोकॉलचं उल्लंघन होत असल्याचा ममतांचा आरोप

राज्यपाल धनखड यांनी हिंसा पिडीत लोकांची त्यांच्या जिल्ह्यात आणि आसाममध्ये जाऊन भेट घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, राज्यपालांच्या या दौऱ्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतलाय.

Violence in Bengal : ममता बॅनर्जी आणि राज्यपाल पुन्हा आमनेसामने, प्रोटोकॉलचं उल्लंघन होत असल्याचा ममतांचा आरोप
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 9:36 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि राज्यपाल जगदीप धनखड (Governor Jagdeep dhankhar) पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. राज्यपाल धनखड यांनी हिंसा पिडीत लोकांची त्यांच्या जिल्ह्यात आणि आसाममध्ये जाऊन भेट घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, राज्यपालांच्या या दौऱ्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतलाय. ममता यांनी राज्यपालांवर मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाचा अपमान करण्याचा आरोप केलाय. तसंच राज्यपालांना एक पत्र पाठवून हा दौरा रद्द करण्याची मागणी केली आहे. (Mamata Banerjee opposes Governor Jagdeep Dhankhad visits violence-hit areas)

राज्यपाल जगदीप धनखड हे 13 मे रोजी सीतलकुची आणि कूचबिहारमधील हिंसा प्रभावित भागाचा दौरा करणार आहेत. तर 14 मे रोजी ते आसामच्या रनपगली आणि श्रीरामपूर कँपमध्ये राहणाऱ्या बंगालच्या लोकांची भेट घेणार आहेत. राज्यपाल धनखड यांनी स्वत: ट्वीट करुन त्याबाबत माहिती दिलीय. आपण बीएसएफच्या हेलीकॉप्टरने हिंसा प्रभावित भागाचा दौरा करणार आहोत. तिथे माथाभांगा आणि सिताईलाही जातील. तिथे हिंसाचाराने पीडित नागरिकांची भेट घेतील.

‘राज्याला सूचना न देताच दौरा’

राज्यपालांना लिहिलेल्या पक्षात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की, राज्यपालांचे सचिव जिल्हांच्या दौरा राज्य सरकारच्या आदेशानंतर निश्चित करतात. राज्यपालांचा दौऱ्याला जिल्हा आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या विचारानंतर अंतिम रुप दिलं जातं. आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की, 13 मे रोजी राज्यपाल जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत आणि हे चालत आलेल्या परंपरेचं उल्लंघन असल्याचं ममता यांनी म्हटलंय. राज्यपाल चालत आलेल्या प्रोटोकॉलचं पालन करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय.

‘मंत्रिमंडळाचा अवमान करुन थेट अधिकाऱ्यांशी चर्चा’

ममता बॅनर्जी यांनी आपल्या मागील पत्रांचा उल्लेख करताना म्हटलंय की, त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाचा अवमान करत थेट अधिकाऱ्यांशी चर्चा करणं बंद करावं. तुम्ही नियमांची अवहेलना करुन थेट अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहात. त्यांना आग्रह आहे की अशा प्रकारच्या वर्तनापासून स्वत:ला दूर ठेवावं. या प्रकरणी आपण मुख्य सचिवांनाही निर्देश देत असल्याचं ममता यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

पीएम केअरचा पैसा बाहेर काढा, सेंट्रल विस्टाचं काम थांबवा; 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं मोदींना खुल पत्रं

‘बंगालमधील राजकीय हिंसेत 16 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्याची ममता बॅनर्जींची घोषणा

Mamata Banerjee opposes Governor Jagdeep Dhankhad visits violence-hit areas

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.