राहुल गांधी यांनी लावली मणिपूरमध्ये आग, राज्यसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कडाडल्या

कॉंग्रेस शासित राज्यातील महिला बलात्कारावर बोलण्याचे धाडस तुमच्यात आहे का? जर ते या घटनांवर बोलू शकत नाहीत तर त्यांनी महिला मंत्र्यांवर अनावश्यक दबाव टाकू नये असेही स्मृती इराणी म्हणाल्या.

राहुल गांधी यांनी लावली मणिपूरमध्ये आग, राज्यसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कडाडल्या
smriti irani Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 10:21 PM

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मणिपूर प्रकरणात कॉंग्रेस सदस्याच्या प्रश्नावर प्रचंड संताप व्यक्त करीत कॉंग्रेस मणिपूर हिंसे मागील सत्य दडपत असल्याचा आरोप केला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये आग लावल्याचाही आरोप स्मृती इराणी यांनी केला. संसदेत प्रश्नोत्तराच्या तासांत त्यांनी कॉंग्रेसवर तिखट शब्दात वार केले.

कॉंग्रेसचे सदस्य खासदार अमी याग्निक यांनी महिला मंत्री मणिपूर घटनेवर का बोलत नाहीत असा आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यावर अत्यंत आक्रमक शब्दात प्रत्युत्तर दिले. अमी याग्निक यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत राज्यसभेत पूरक प्रश्न विचारताना महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील महिला सहकारी मणिपूर मु्द्द्यावर गप्प का ? यावर स्मृती इराणी भडकल्या. त्यांनी म्हटले की यावर माझा तीव्र आक्षेप आहे. केवळ महिला मंत्री नव्हे तर महिला राजकीय नेत्यांनी मणिपूर सोबतच छत्तीसगड, राजस्थान तसेच बिहारमध्ये होणाऱ्या घटनांवरही लक्ष केंद्रीत करायला हवे. या राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवर ते बोलण्याचे धाडस दाखवू शकतात काय ? असा सवाल त्यांनी केला.

राहुल गांधी मणिपूरला गेल्यानंतरच…

तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही छत्तीसगड बद्दल बोलाल,राजस्थानातील बिहारमधील घटनांवर बोलाल, तुमच्यात लाल डायरीबद्दल बोलण्याचे धाडस आहे का ? त्यांच्यात हे बोलण्याचे धाडस आहे का की एक कॉंग्रेसचा नेता तेथे गेल्यानंतर मणिपूर जळू लागले. यह बोलण्याचे धाडस आहे का की राहुल गांधी मणिपूरला गेल्यानंतरच तेथे हिंसा वाढू लागली असा जोरदार प्रहार स्मृती इराणी यांनी यावेळी करीत संसद दणाणून सोडली.

तरच तुम्हाला अधिकार 

कॉंग्रेस शासित राज्यातील महिला बलात्कारावर बोलण्याचे धाडस तुमच्यात आहे का? जर ते या घटनांवर बोलू शकत नाहीत तर त्यांनी महिला मंत्र्यांवर अनावश्यक दबाव टाकू नये असेही त्या म्हणाल्या. लोकसभेत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी मणिपूर प्रकरणावर सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर बोलण्यास तयार असल्याचे पत्र दोन्ही सभागृहांच्या विरोधी नेत्यांनी लिहीले आहे. या प्रकरणी सौहार्दात्मक चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.