Viral video : शिवलिंगावर बिअर ओतणारे ते तरूण मुस्लीम नाहीत! पोलिसांनी सांगितलं पंचकुलातल्या घटनेमागचं सत्य

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दिनेश कुमार आणि नरेश कुमार नावाच्या दोन तरुणांना अटक केली. चौकशीत हा व्हिडिओ पंचकुला घग्गर नदीच्या काठावर शूट केल्याचे आढळून आले.

Viral video : शिवलिंगावर बिअर ओतणारे ते तरूण मुस्लीम नाहीत! पोलिसांनी सांगितलं पंचकुलातल्या घटनेमागचं सत्य
व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यातील हिंदू तरूणImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 10:10 PM

नवी दिल्ली/मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तलावाच्या काठी दोन तरूण बसले आहेत. त्यांच्या हातात कोल्डड्रिंकचा असतो तसा कॅन आहे. त्या तलावाच्या काठी शिवलिंगदेखील दिसत आहे. या शिवलिंगावर दोघांपैकी एक तरूण आपल्या कॅनमधील ड्रिंक ओतताना दिसत आहे. तर या सर्व घटनेचा व्हिडिओ शूटदेखील होत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये भगवान शिवाशी संबंधित गाणेदेखील आपल्याला ऐकायला मिळत आहे. आता ट्विटर यूझर असलेल्या दीपक शर्माने व्हायरल व्हिडिओ ट्विट (Tweet) केला आणि लिहिले आहे, की शिवलिंगावर बिअर (Beer) ओतून हिंदूंच्या भावना भडकावल्या जात आहेत. कृपया लक्षात घ्या, हे दोन जिहादी जनतेच्या हाती पडले तर लोक घटनेच्या नावे गळे काढतील. दरम्यान, हा व्हिडिओ चंदीगडचा असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ दिशाभूल करणारा

फेसबुक यूजर मनजीत सिंग बग्गा यांनी व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले आहे, की पाहा हे मुल्ला शिवलिंगावर बिअर ओतून शिवलिंगाचा कसा अपमान करत आहेत. या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यात येत आहे. व्हिडिओसह केलेला दावा दिशाभूल करणारा असल्याचे निष्पन्न झाले. आशिष मिश्रा नामक व्यक्तीनेदेखील व्हिडिओ ट्विट केला आहे.

हे सुद्धा वाचा

ते तर भाजीविक्रेते

याप्रकरणी शिवलिंगावर बिअर ओतणाऱ्या दोन आरोपींना आयटी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. मात्र हे तरूण व्हायरल व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मुस्लीम नसून हिंदू असल्याचे समोर आले आहे. नरेश आणि दिनेश अशी आरोपींची नावे असून ते इंदिरा कॉलनीतील रहिवासी आहेत. डीएसपी एस. पी. एस. सोंधी यांनी सांगितले, की दोन्ही तरूण बाजारात भाजी विकण्याचे काम करतात. पोलिसांना दिलेल्या जबानीत आरोपींनी सांगितले, की तलावाच्या काठी एक शिवलिंग आण्ही पाहिले. ते स्वच्छ करण्यासाठी आम्ही हे कृत्य केले.

व्हायरल झालेला व्हिडिओ

हिंदू संघटनांनी केला होता विरोध

इंडियन एक्स्प्रेसने 27 जून 2022 रोजी या घटनेचा इतिवृत्तांतही प्रकाशित केला होता. त्यानुसार हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दिनेश कुमार आणि नरेश कुमार नावाच्या दोन तरुणांना अटक केली. चौकशीत हा व्हिडिओ पंचकुला घग्गर नदीच्या काठावर शूट केल्याचे आढळून आले. दोघेही मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांना नदीच्या काठावर शिवलिंग आढळून आले. त्यांनी ते स्वच्छ करण्यासाठी त्यावर बिअर ओतली. दोघांनी असा दावा केला की घटनास्थळी एक अल्पवयीन मुलगा उपस्थित होता आणि त्यांच्या सांगण्यावरून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तीन दिवसांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी विरोध केला. यातील एका संस्थेने शुक्रवारी आयटी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अटकेनंतर दोघांवर भादंवि कलम 295A लावण्यात आले आहे.

खात्री न करता व्हिडिओ व्हायरल करणे बेजबाबदारपणा

आयटी पार्क पोलीस स्टेशनचे एसएचओ रोहताश यादव यांनी सांगितले, की नरेश आणि दिनेश अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत. दोघेही हिंदू समाजाचे आहेत. ही घटना आमच्या भागाशी संबंधित नसून तक्रारीच्या आधारे आम्ही कारवाई केली आहे. एकूणच अशाप्रकारे बेजबाबदारपणे व्हिडिओ व्हायरल करून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचाच हा प्रयत्न दिसून येत आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.