Visa : पैसा, प्रसिद्धी कशाला? परदेशात जाण्याचा योग घडवून आण देवा, व्हिसा मिळवण्यासाठी या मंदिरात भक्तांची अलोट गर्दी..

Visa : परदेशात जाण्यासाठी अनेक भाविक या मंदिरात अलोट गर्दी करतात.

Visa : पैसा, प्रसिद्धी कशाला? परदेशात जाण्याचा योग घडवून आण देवा, व्हिसा मिळवण्यासाठी या मंदिरात भक्तांची अलोट गर्दी..
भक्तांचे साकडे Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 8:20 PM

नवी दिल्ली : मंदिरात (Temple) गेल्यावर आपण देवाकडे काय मागतो? चांगले आरोग्य, चांगले राहणीमान, भरपूर पैसा, संपत्ती, घर, चांगले शिक्षण, एखादी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना (Prayers) करतो. पण देशात हे एक मंदिर आहे, जिथे भाविक परदेशात जाण्यासाठी देवाला साकडे घालतात. देवालाच परदेशात जाण्यासाठी (Foreign) नवस बोलतात. त्यामुळे दक्षिणेतील हे मंदिर व्हिसा मंदिर (Visa Temple) म्हणूनही लोकप्रिय आहे.

‘श्री लक्ष्मी व्हिसा गणपती मंदिर’ (Sri Lakshmi Visa Ganapathy Temple) असे या मंदिराचे नाव आहे. हे मंदिर चेन्नई येथे आहे. विशेष म्हणजे चेन्नईजवळील विमानतळापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेर तुम्हाला भाविकांची लांबच लांब रांग दिसून येईल. भारतभरातून येणारे भाविक याठिकाणी एकच नवस बोलतात.

एका बातमीनुसार, भाविकांची मान्यता आहे की, येथील गणपती बाप्पाकडे (Lord Visa Ganesha) मनोभावे नवस केल्यास तुमची परदेश वारी निश्चित असते. आयटी सेक्टरमधील अर्जुन विश्वनाथन हा तरुण सकाळीच मंदिरात आला होता. अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळावा म्हणून मुलाखत यशस्वी व्हावी अशी प्रार्थना तो करत होता.

हे सुद्धा वाचा

त्याने दावा केला की, 10 वर्षांपूर्वी तो भावाला इंग्लंडचा व्हिसा मिळावा यासाठी या मंदिरात आला होता. तर दोन वर्षांपूर्वी पत्नीला अमेरिकेचा व्हिसा मिळावा म्हणून तर सध्या त्याला अमेरिकेत नोकरीची संधी असल्याने व्हिसा मिळावा म्हणून त्याने देवाला साकडे घातले आहे.

हे मंदिर इतके लहान आहे की तिथे पुजारी धड उभाही राहू शकत नाही. पण येथे भक्तांची अलोट गर्दी होते. या मंदिरापासून थोड्या अंतरावर ‘श्री लक्ष्मी नरसिंह नवनीत कृष्णन मंदिर’ (Sri Lakshmi Narasimha Navaneeth Krishnan Temple) मंदिर आहे. येथील हनुमानाच्या मंदिरातही भक्तांची गर्दी असते.

हनुमानाला अंजनेय नावाने ओळखल्या जाते. या मंदिराला अमेरिका अंजनेय अथवा व्हिसा अंजनेय या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. या मंदिरातही भाविकांची दररोज झुंबड असते. परदेशात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे आवर्जून या मंदिरात दर्शन घेतात.

तर पंजाबमधील जालंधर येथे 150 वर्षांपूर्वीचा गुरुद्वारा आहे. स्थानिक भाविकभक्त याला व्हिसा गुरुद्वारा (Visa Gurudwara) या नावाने ओळखतात. शहीद बाबा निहाल सिंह गुरुद्वारामध्ये (Shaheed Baba Nihal Singh Gurudwara Jalandhar) भाविक परदेशात जाण्यासाठी डोकं टेकवतात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.