येत्या 24 तासांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भात गारपीटीची शक्यता

गारपिटीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. खरीप पिके व भाजीपाला वाचविण्यासाठी शेतक्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. (Warning of heavy rains in the some part of country in the next 24 hours, hailstorm in Vidarbha)

येत्या 24 तासांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भात गारपीटीची शक्यता
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 9:42 PM

नवी दिल्ली : येत्या 24 तासांत देशातील बर्‍याच भागात हवामानातील मोठा बदल दिसून येईल. भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार, जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे शुक्रवारी वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीसह 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि तेलंगणात एक-दोन ठिकाणी गारपीट होऊ शकते. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी पिकाची कापणी केली आहे त्यांनी आपले पीक सुरक्षित केले पाहिजे. गारपिटीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. खरीप पिके व भाजीपाला वाचविण्यासाठी शेतक्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. (Warning of heavy rains in the some part of country in the next 24 hours, hailstorm in Vidarbha maharashtra)

हवामान खात्याच्या माहितीनुसार, शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये वातापरण स्वच्छ असेल. तापमानात घट झाल्यामुळे लोकांना उष्णतेपासून आराम मिळू शकेल. बिहारमध्ये वातावरण ढगाळ असेल. तथापि, पावसाची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर झारखंडमध्ये पुढील तीन दिवस म्हणजे 18 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे. राज्यातील बर्‍याच भागात धुळीच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

या राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

स्कायमेट वेदर रिपोर्टनुसार देशातील बर्‍याच राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, उत्तर आंतरिक कर्नाटक आणि केरळच्या बर्‍याच भागांत मुसळधार पाऊस पडेल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण आणि पश्चिम मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडेल. पश्चिम हिमालयात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे, जो हळूहळू मुसळधार होऊ शकतो आणि 17 एप्रिलपर्यंत सुरू राहील.

या भागात जोरदार वारे वाहतील

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आसाम व मेघालयातील काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारा वारे वाहू शकतात. हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, गंगा पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा, तेलंगणा, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल आणि केरळमधील काही ठिकाणी जोरदार वारे वाहू शकतील. पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, उप-हिमालय पश्चिम बंगाल, आणि सिक्कीम, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, रॉयलसिमा, अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, कर्नाटक आणि लक्षद्वीप येथे वीज पडण्याची भीती आहे. (Warning of heavy rains in the some part of country in the next 24 hours, hailstorm in Vidarbha maharashtra)

इतर बातम्या

Umar Khalid Bail | उमर खालीदला जामीन मंजूर, आरोग्य सेतू अ‌ॅप डाऊनलोड करणे बंधनकार

जामखेडच्या रुग्णालयातील उपचारपद्धती कोरोनावर फायदेशीर? विचार व्हावा, रोहित पवारांचं आवाहन

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.