संस्कार, संस्कृती, सन्मान, सगळं एकाच सुंदर फ्रेममध्ये आणि मोदींनीही नम्रपणे जमिनीला हात टेकले!
Swami Sivananda Video : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी 128 जणांना पद्म पुरस्कार देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
नवी दिल्ली : सोमवारी एक सुंदर चित्र संपूर्ण देशानं अनुभवलं. एकाच फ्रेममध्ये संस्कार, संस्कृती आणि सन्मान अशी विलक्षण सुंदर फ्रेम कॅमेऱ्यात कैद झाली. निमित्त होत पद्म पुरस्कारांच्या (Padma Award) वितरण सोहळ्याचं. सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय आणि अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या स्वामी शिवानंद (Swami Shiwanand) यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्यांना पुरस्कार देण्याआधी एक विलक्षण गोष्ट संपूर्ण देशानं अनुभवली. यावेळी स्वामी शिवानंद यांनी उठून सगळ्यात आधी गुडघ्यावर टेकून नतमस्तक होत दोन्ही हात जोडून उपस्थितांना वंदन केलं. यावेळी समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अमित शाह आणि इतर दिग्गजही बसले होते. स्वामींची ही कृती पाहून मोदीही भारावून गेले. ते उठले आणि त्यांनीही वाकून जमिनीला हात टेकले.
यानंतर स्वामी शिवानंद पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या दिशेनं गेले. तिथेही त्यांनी रामनाथ कोविंद यांना आदरपूर्वक नमस्कार केला. यानंतर राष्ट्रपतींनी आपल्या जागेवरुन उठून स्वामी शिवानंद यांना नमस्कार केला.
पाहा व्हिडीओ :
ये आज की सबसे ख़ूबसूरत तस्वीर है.. इसमें संस्कार है, संस्कृति है, सम्मान है, अनकहे ही संवाद है पद्मश्री स्वामी शिवानंद से मिलिए, 125 साल की उम्र में इनकी रगों में दौड़ते हिंदुस्तान को महसूस कीजिए.. pic.twitter.com/XTWKrYdzvN
— Rubika Liyaquat (@RubikaLiyaquat) March 21, 2022
कोण आहेत स्वामी शिवानंद?
स्वामी शिवानंद हे 125 वर्ष वयाचे असून त्यांनी योगा क्षेत्रात भरीव योगदान दिलेलं आहे. योग सेवक या नावानं ते प्रसिद्ध आहे. वाराणसीमध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आहे.
इतर कुणाकुणाला पुरस्कार?
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी 128 जणांना पद्म पुरस्कार देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यापैकी चार पद्म विभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यात बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविद यांन जीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांना या पुरस्कार सुपुर्द केला. गेल्या वर्षी बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
दरम्यान, काँग्रेसचे वरीष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनाही राष्ट्रपती कोविंद यांनी पद्म पुरस्कारानं सन्मानित केलं. सोबतं देवेंद्र झाजरीया यांना पद्म भीषण, सायरस पुनावार यांना पद्म भूषण, चंद्रप्रकार द्रिवोदी यांना पद्मश्री, वंदना कटारीया यांना पद्मश्री आणि अवनी लेखरा यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
भाजपकडून चारही राज्यात विद्यमान मुख्यमंत्र्यांनाच पुन्हा संधी! कोणत्या राज्यात मुख्यमंत्रीपदी कोण?
सिद्धू, चन्नी, कॅप्टन यांना पराभवाची धूळ चारणाऱ्या AAP आमदारांना कॅबिनेटमध्ये स्थान नाही!