अजितदादांच्या धरणाच्या विधानाची आठवण करून देणारं भाजप मंत्र्याचं धक्कादायक विधान, मंत्री महोदय नेमकं काय म्हणाले?

Water Crisis : पाणी टंचाई महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेली आहे. काही वर्षांपूर्वी अजितदादांच्या धरणाविषयीच्या विधानाने राज्यातच नाही तर देशात खळबळ माजवली. आता भाजप नेत्याने पाणी टंचाईवर त्यांची असंवेदनशीलता दाखवली, काय म्हणाले हे मंत्री महोदय?

अजितदादांच्या धरणाच्या विधानाची आठवण करून देणारं भाजप मंत्र्याचं धक्कादायक विधान, मंत्री महोदय नेमकं काय म्हणाले?
भाजप नेत्याच्या विधानाने ओढवला वाद
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 9:16 AM

तर दुष्काळ हा महाराष्ट्राच्याच नाही तर देशातील अनेक भागांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. अनेक योजना आल्या आणि इतिहासजमा झाल्या. त्यातून मोठी फलनिष्पती झालेली नाही. काही वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा असताना अजितदादा यांच्या धरणाच्या विधानाने मोठा गदारोळ झाला होता. देशात त्यांच्या विधानाचे पडसाद उमटले होते. आता या भाजप नेत्याचे विधान चर्चेत आले आहे.

राजस्थानमध्ये तीव्र जलसंकट

राजस्थानमध्ये तीव्र जलसंकट उभे ठाकले आहे. त्यातच राज्यातील काही भागात पारा 50 अंशांच्या घरात गेल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अनेक शहरात पाणी पुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. भर उन्हाळ्यात नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सरकार पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन करत आहे. पण पिण्याचे पाणीच पिळत नसल्याची ओरड होत आहे.

हे सुद्धा वाचा

मी फुक मारुन पाणी कसे आणू?

पाण्यावरुन राजस्थानमध्ये महाभारत होत असताना राजस्थानचे मंत्री कन्हैया लाल चौधरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘मी फुक मारुन पाणी घेऊन येऊ, वा हनुमानसारखं लागलीच पाणी आणू, असं शक्य नाही’, असे विधान त्यांनी केले. जितके पाणी आहे, तितका पुरवठा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. लोकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले.

पाण्याची नासाडी करेल, त्यावर कारवाई

यंदा राजस्थानमध्ये तापमानाने कहर केला आहे. उष्णतेने अनेकांचे मृत्यू ओढावले आहेत. याकाळात पाण्याची नासाडी करताना कोणी आढळला तर त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा चौधरी यांनी दिला. जिथे पिण्याच्या पाण्याची गरज आहे, तिथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यावर भर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

‘पारा’ चढला

राजस्थानमध्ये तापमान वाढले आहे. रविवारी उष्णतेमुळे एकाचा मृत्यू झाला. सोमवारी फलोदीत तापमान 49.4 डिग्री सेल्सिअसवर पोहचले. बाडमेरमध्ये 49.3 डिग्री, जेसलमेरमध्ये 48.7 डिग्री, पिलानीमध्ये 48.5 डिग्री, करोलीमध्ये 48.4 डिग्री, गंगानगरमध्ये 48.3 डिग्री, बिकानेर-कोटा-फतेहपूरमध्ये 48.2 डिग्री, धोलपूरमध्ये 48.1 डिग्री आणि चूरूमध्ये 48 डिग्री सेल्सिअस इतका पारा चढला होता. राजधानी जयपूरमध्ये तापमान 46.4 डिग्री सेल्सिअस होते.

येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.