आमच्यात सर्जिकल स्ट्राईकची हिंमत, पण चर्चेचे धाडस कुठंय? मणिशंकर अय्यर म्हणाले, पाकिस्तान स्वत: दहशतवादाचा बळी
Manishankar Iyer on Pakistan : काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी सांगितले की, पाकिस्तानशी भारताने चर्चा करणे आवश्यक आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक तर केली पण सरकारकडे चर्चेचे धाडस नसल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तान प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे. पाकिस्तानशी भारताने चर्चा करणे आवश्यक आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक तर केली पण सरकारकडे चर्चेचे धाडस नसल्याचे ते म्हणाले. दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान सुद्धा त्याचा बळी आहे. पाकिस्तानला वाटत होतं की अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आणता येईल. आता त्यांच्यासाठी तालिबान आता डोकेदुखी ठरल्याचा दावा अय्यर यांनी केला.
पाकिस्तानशी चर्चा व्हायला हवी
पाकिस्तानला आपल्या गळ्यात लटकवून ठेवणे हा सर्वात मोठा धोका असल्याचे ते म्हणाले. हे आपल्यासाठी आत्मघातकी आहे. भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करणे आवश्यक आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काश्मीर मुद्दावर हीच भूमिका घेतली होती. पाकिस्तानातील नागरीक हे पण भारतीय नागरीकांसारखेच आहेत. पण फाळणीच्या दाहतकतेने ते वेगळे झाले. त्यांचा एक दुसरा देश झाला. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी शेख हसीना यांनी भारतासाठी केलेल्या कामाबद्दल स्तुति पण केली.
बांगलादेशात हिंदूवर हल्ले
बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर हल्ले होत आहे, हे अय्यर यांनी मान्य केले. पण ते शेख हसीना यांचे समर्थक असल्याने त्यांच्यावर हल्ले होत असल्याचे ते म्हणाले. हिंदूवरील हल्ल्यांच्या वृत्त खरी आहेत, पण त्या अतिशोयक्तीपूर्ण असल्याचे ते म्हणाले. राजकीय मतभेद संपवण्यासाठी खासकरून संघर्ष होतात. पत्नीचा संदर्भ देताना ते म्हणाले की एक तामिळ म्हणून माझ्या पंजाबी पत्नीत आणि पाकिस्तानमधील पंजाबी व्यक्तीत मला फारसे अंतर दिसत नाही.
शेख हसीनाचे केले कौतुक
शेख हसीना यांची त्यांनी कौतुक केले. शेख हसीना यांनी भारतासाठी चांगलं काम केले आहे, यावर सर्वांची सहमती असेल असे ते म्हणाले. त्यांना भारतात आश्रय देण्यात आला, याचा मला आनंद आहे. मला वाटते त्यांना जितके दिवस हवे तितके दिवस राहू द्या. त्यांना आयुष्यभर जरी राहायचे काम पडले तरी त्यांना देशात राहु द्या असे ते म्हणाले.