Amarnath Yatra : अमरनाथ गुहेजवळ हवामान खराब, बचावकार्यात जवानांना अडचणी, काय आहे स्थिती?

ज्या पवित्र गुहेच्या मंदिराजवळ पुरस्थिती निर्माण झाली होती तेथील वाटेत आता प्रवासी नसल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत 15 हजार नागरिकांना सुकरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. निमलष्करी दलाच्या डॉक्टर आणि वैद्यकीय जवानांनी पुरात गंभीर जखमी झालेल्या नऊ रुग्णांवर उपचार केल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

Amarnath Yatra : अमरनाथ गुहेजवळ हवामान खराब, बचावकार्यात जवानांना अडचणी, काय आहे स्थिती?
अमरनाथ येथे निर्माण झालेल्या परस्थितीमध्ये बचावकार्य करताना जवान
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 4:51 PM

दिल्ली :  जम्मू काश्मीरातील (Amarnath Cloudburst) अमरनाथ गुहेच्या मंदिराजवळ (View of the cloudburst) ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे अचानक आलेल्या पुर आल्यामुळे 150 यात्रेकरुंना खालच्या (Base Camp) बेस कॅम्पमधील पंजतरणी येथे हलविण्यात आले आहे. ओढावलेल्या या परस्थितीमुळे पंजतरणीपर्यंतच्या मार्गावर पथकांची संख्याही वाढविली आहे. तर अमरनाथ गुहेनंतर पुन्हा एकदा हवामान बिघडलं असून त्यामुळे भारतीय लष्कराला बचावकार्यात अडचणी येत असल्याचं आयटीबीपीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या पुरामध्ये किमान 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेनंतर 30 जूनपासून सुरु होणारी अमरनाथची यात्रा देखील आता पुढे ढकलण्यात आली आहे. प्रतिकूल परस्थितीमुळे गुहेच्या परिसरात अडकलेल्या प्रवाशांना पंजतराणी येथे हलविण्यात आले आहे.

15 हजार नागरिकांचे बचाव कार्य

ज्या पवित्र गुहेच्या मंदिराजवळ पुरस्थिती निर्माण झाली होती तेथील वाटेत आता प्रवासी नसल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत 15 हजार नागरिकांना सुकरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. निमलष्करी दलाच्या डॉक्टर आणि वैद्यकीय जवानांनी पुरात गंभीर जखमी झालेल्या नऊ रुग्णांवर उपचार केल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. या नागरिकांवर बेस कॅम्पमध्येच उपचार सुरु आहेत.

बेसच्या कॅम्पमध्येही घुसले पाणी

शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ढगफुटी झाली आणि डोंगराच्या उतारावरील पाण्याचा आणि गाळाचा दाट प्रवाह दरीच्या दिशेने वाहू लागला. त्यामुळे पुरस्थिती तर निर्माण झालीच पण मंदिराच्या बाहेर असलेल्या बेस कॅम्पमध्ये पाणी शिरले. एवढेच नाहीतर कॅम्पमधील 25 तंबू आणि तीन कम्युनिटी किचनचे नुकसान झाले आहे. याच ठिकाणाहून यात्रेकरुंना जेवण दिले जात असत.शनिवारी सकाळी हवाई बचाव कार्य सुरू करण्यात आले असून सहा यात्रेकरूंना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या रुग्णांना निलगार हेलिपॅडवर दाखल करण्यात येत आहे, जिथे लष्करी वैद्यकीय पथके त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि त्यांना पुन्हा पुढे पाठवले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.