Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Welcome 2023: नवीन वर्षात लोकांनी किती लाख बिर्याणीची ऑर्डर केली? पिझ्झाचा आकडा वाचून तर चकरावूनच जाल!

फूड डिलिव्हरी ऍप स्विगीने शनिवारी रात्री किती लाख बिर्याणीच्या आणि पिझ्झा डिलीव्हर केल्या माहिती आहे?

Welcome 2023: नवीन वर्षात लोकांनी किती लाख बिर्याणीची ऑर्डर केली? पिझ्झाचा आकडा वाचून तर चकरावूनच जाल!
स्विगीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 3:50 PM

मुंबई, न्यू ईयर सेलिब्रेशन (New Year 2023) हे चटक-मटक पदार्थांशिवाय अपुर्णच असते. यंदा खवय्यांनी आणि पिझ्झावर सर्वाधिक ताव मारल्याचे समोर आले आहे.  फूड डिलिव्हरी ऍप स्विगीने शनिवारी 3.50 लाख बिर्याणीच्या ऑर्डर दिल्या. रात्री 10.25 वाजेपर्यंत 61 हजारांहून अधिक पिझ्झा डिलीव्हर केले. त्याच वेळी, हैदराबादी बिर्याणीला 75.4 टक्के ऑर्डर मिळाल्या, तर लखनौला 14.2 टक्के आणि कोलकाताला 10.4 टक्के ऑर्डर मिळाल्या. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक 3.50 लाख ऑर्डर्ससह बिर्याणीची डिलिव्हरी झाली आहे.

61,287 पिझ्झा डिलीव्हर केले

हे सुद्धा वाचा

स्विगी अॅपने शनिवारी संध्याकाळी 7.20 वाजता 1.65 लाख बिर्याणीच्या ऑर्डर दिल्या. हैदराबादच्या बावर्ची रेस्टॉरंटने 31 डिसेंबर 2023 ची मागणी पूर्ण करण्यासाठी 15 टन चविष्ट पदार्थ तयार केले. स्विगीने ट्विट केले की 61,287 डॉमिनोज पिझ्झाची डिलिव्हरी झाली आहे. त्यांच्यासोबत ओरेगॅनोची किती पाकिटे जात असतील याची आपण कल्पना करू शकतो.

12,344 खिचडी ऑर्डर

शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चिप्सची 1.76 लाख पॅकेट ऑर्डर करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. देशातील 12,344 लोकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खिचडीची ऑर्डर दिली. स्विगीचे सीईओ श्रीहर्ष मॅजेती यांनी ट्विट केले की, पार्टी सुरू होण्यापूर्वीच ती जोरदार सुरू झाली आहे. आम्ही 1.3 दशलक्षाहून अधिक ऑर्डर दिल्या आहेत.

मुंबईत नववर्षाचे धुमधडाक्यात स्वागत

मुंबईत सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं धूमधडाक्यात स्वागत झालं. रात्रीच्या 12 च्या ठोक्याला ‘हॅपी न्यू इयर’चा एकच जयघोष सर्वांच्या तोंडी होता. जे झालं ते झालं. आता नवी सुरुवात, नवे संकल्प, नव्या आशांना मनात रुंजी घालून जो तो नव्या वर्षांच्या जल्लोषमय रात्री न्हावून गेला होता.

सर्वत्र ओसंडून वाहणार्‍या जल्लोषाने शहरं बहरून गेली होती. कुठे हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत, तर कुठे डीजेच्या ठेक्यावर बेधूंद होऊन, तर कुठे ‘एकच प्याला’ रिचवतं. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.

हा संपूर्ण नजारा दादरच्या चौपाटीवरनं पाहण्यासाठी प्रमाणात मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. रात्री 12 वाजता चौपाटीचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. दादरच नव्हे तर गिरगाव, जुहू, मढ, मार्वे आणि मुंबईसह राज्यातील चौपाट्या आणि समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले होते. शहरात होणाऱ्या आतिषबाजी पाहत हॅप्पी न्यू इयर बोलत एकामेकांना शुभेच्छा देत असल्याचे चित्र चौपाटी परिसरात दिसून आले.

मुंबईजवळच्या माथेरानमध्ये ‘थर्टी फर्स्ट’चं सेलिब्रेशनला दणक्यात करण्यात आलं. माथेरानमध्ये हॉटेलचालकांनी थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. अनेक हॉटेल्समध्ये डीजे पार्ट्या पार पडल्या. या पार्ट्यांमध्ये पर्यटक जल्लोष करताना दिसले.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.