West Bengal Election 2021 : सोनारपुरात भाजप कार्यकर्त्याची हत्या, घाटालमध्ये उमेदवाराला बुटाने मारहाण!

पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच TMCवर भाजप कार्यकर्त्याच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील सोनारपूर दक्षिणमधल रहिवासी विकास नस्कर या भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे.

West Bengal Election 2021 : सोनारपुरात भाजप कार्यकर्त्याची हत्या, घाटालमध्ये उमेदवाराला बुटाने मारहाण!
पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये भाजप कार्यकर्त्यावर हल्ला
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 5:08 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हिंसेचे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच TMCवर भाजप कार्यकर्त्याच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील सोनारपूर दक्षिणमधल रहिवासी विकास नस्कर या भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते. पुरुलियामध्ये त्यांनी एका रॅलीला संबोधित केलं. त्याचवेळी दुसरीकडे भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप होतोय.(Attacks on BJP candidates and activists in Sonarpur, Nandigram, Ghatal in West Bengal)

पश्चिम बंगाल भाजपने दिलेल्या माहितीनुसार विकास नस्करची हत्या करण्यात आली आहे. तो बूथ नंबर 57 मधील भाजपचा कार्यकर्ता होता. ही फक्त एका युवकाची हत्या नाही तर लोकशाहीची हत्या आहे. बंगालची जनताच याचं उत्तर देईल, असं भाजपनं म्हटलंय.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सभेत हल्ल्याचा आरोप

दुसरीकडे नंदीग्रामध्ये भाजप उमेदवार शुभेंदु अधिकारी यांना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत सोनाचुडा इथं एका रोड शो मध्ये सहभागी व्हायचं होतं. मात्र, त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. त्यात भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने नंदीग्राम रुग्णालयात भरती करण्यात आलं. याबाबत भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

घाटालमध्ये भाजप उमेदवाराला बुटाने मारहाण झाल्याचा आरोप

भाजपचे पूर्व बेदिनीपूर जिल्ह्यातील घाटाल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शीतल कपट यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवाला बुटाने मारहाण करण्यात आली आहे. तर उत्तर 24 परगनाच्या बैरकपूरमध्ये भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्या मतदारसंघात बॉम्बस्फोट आणि भाजप उमेदवारांवर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचं एक प्रतिनिधी मंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. त्यावेळी कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून सातत्याने राजकीय हिंसाचाराचा आरोप केला जात आहे. गुरुवारी पुरुलियामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनीही राजकीय हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली होती. तसंच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत इशारावजा सूचनाही केली होती. असं असलं तरीही भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचे प्रकार सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

West Bengal Election 2021 : शुभेंदु अधिकारींचं दोन मतदारसंघातील मतदार यादीत नाव, TMCची कारवाईची मागणी

West Bengal Election 2021 : ‘मां, माटी और मानुष’वरुन राजनाथ सिंहांचा ममतांना टोला, सत्ता आल्यास राजकीय हत्या थांबवण्याचाही दावा

Attacks on BJP candidates and activists in Sonarpur, Nandigram, Ghatal in West Bengal

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.