West Bengal Election 2021 : मोदींच्या पाया पडण्यासाठी कार्यकर्ता सरसावला, मोदींनीही वाकून नमस्कार केला! पाहा व्हिडीओ

व्यासपीठावर उपस्थित एक कार्यकर्ता मोदींच्या पाया पडला. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही त्या कार्यकर्त्याला वाकून नमस्कार केला. भाजपच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.

West Bengal Election 2021 : मोदींच्या पाया पडण्यासाठी कार्यकर्ता सरसावला, मोदींनीही वाकून नमस्कार केला! पाहा व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जनतेला संबोधित करताना
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 3:04 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशावेळी एका भाजपच्या एका प्रचार रॅली एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र यांच्या उपस्थितीत ही रॅली पार पडत होती. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित एक कार्यकर्ता मोदींच्या पाया पडला. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही त्या कार्यकर्त्याला वाकून नमस्कार केला. भाजपच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.(PM Narendra Modi bowed to the BJP worker)

जेव्हा मोदी कार्यकर्त्याच्या पाया पडतात!

पश्चिम बंगालमध्ये कांथीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी स्थानिक नेतेमंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तेव्हा अचानक एक कार्यकर्ता उठला आणि त्याने पुढे जात पंतप्रधान मोदी यांच्या पायाला स्पर्श करुन त्यांना नमस्कार केला. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही त्या कार्यकर्त्याला वाकून नमस्कार केल्याचं व्यासपीठावर पाहायला मिळालं.

भाजपने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. “भाजप ही एक अशी संघटना आहे. जिथे कार्यकर्त्यांच्या मनात एकमेकांप्रति समान संस्काराची भावना असते. पश्चिम बंगालमध्ये रॅलीमध्ये व्यासपीठावर जेव्हा एक भाजप कार्यकर्ता पाया पडायला आला, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनीही त्या कार्यकर्त्याच्या पाया पडत अभिवादन केलं”, असं या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे.

टीएमसीच्या पापाचा घडा आता भरलाय – मोदी

दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ममता दीदी आता जात आहेत, पश्चिम बंगालमध्ये आता खऱ्या अर्थानं परिवर्तन होत आहे. आम्फान वादळाने ज्यांचं सर्वस्व हिरावलं. केंद्र सरकारची मदत ‘भाईपो विंडो’मध्ये अडकली. जेव्हा गरज असते तेव्हा ममता दीदी दिसत नाहीत. मात्र, जेव्हा निवडणूक येते तेव्हा दीदी म्हणतात सरकार ‘द्वआरे. द्वआरे’, हाच यांचा खेला आहे, अशा शब्दात मोदींनी ममतांवर हल्ला चढवला.

टीएमसीच्या पापाचा घडा आता भरला आहे. 2 मे रोजी जनता त्यांना शिक्षा देणार आहे. भाजपच्या हाती सत्ता देणार आहे. शिक्षा देण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या आहेत. हे मैदानही आता छोटं पडत आहे, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलाय.

संबंधित बातम्या :

अशी ही बनवाबनवी! मोदी सरकारच्या जाहिरातील घर मिळालेली महिला प्रत्यक्षात राहते झोपडीत

West Bengal Eelection 2021 : भाजपचं ‘संकल्प पत्र’ जाहीर, ‘सोनार बांग्ला’ बनवण्याचं वचन

PM Narendra Modi bowed to the BJP worker

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.