West Bengal Election 2021 : ‘मला हिंदू धर्म शिकवू नका, मी हिंदू ब्राह्मणाची मुलगी’, ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

मला हिंदू धर्म शिकवत आहेत. मी हिंदू ब्राम्हणाची मुलगी आहे. तुमच्यापेक्षा जास्त हिंदू धर्म जाणते. माझ्यासाठी सर्व समान आहेत. सर्व जाती-धर्माचे लोक समान आहेत, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

West Bengal Election 2021 : 'मला हिंदू धर्म शिकवू नका, मी हिंदू ब्राह्मणाची मुलगी', ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची प्रचारसभा
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 3:05 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनपेक्षितपणे हिंदू कार्ड खेळायला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत त्यांनी अनेक हिंदू मंदिरांमध्ये जात दर्शन घेतलं. तर आता दुसऱ्या टप्प्यातही त्यांनी हिंदू कार्ड बाहेर काढलं आहे. मला हिंदू धर्म शिकवत आहेत. मी हिंदू ब्राम्हणाची मुलगी आहे. तुमच्यापेक्षा जास्त हिंदू धर्म जाणते. माझ्यासाठी सर्व समान आहेत. सर्व जाती-धर्माचे लोक समान आहेत, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधलाय.(Mamata Banerjee’s Hindu card in the Assembly elections)

‘दुसऱ्याला चोर म्हणाले स्वत: डाकुंचे सरदार’

“मी लोकांमध्ये भेदभाव करणार नाही. मला आई-वडिलांनी भेदभाव करायला शिकवलं नाही. माझ्या घरात ज्या बाउरी महिला काम करत आहेत. चार महिला काम करतात. सर्वांना नोकरी दिली आहे.” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्याचबरोबर ममता यांनी भाजपचा डाकू असा उल्लेख केलाय. “ते सगळ्यांना चोर म्हणत आहेत. स्वत: ते डाकुंचे सरदार आहेत. भाजप काय करतेय? नोटबंदीचा पैसा कुठे गेला? बँकांचा पैसा कुठे गेला? सर्व काही विक्री काढत आहेत आणि आता बंगालचा सोनार बांग्ला करण्याच्या बाता मारत आहेत. सोनार बांग्लाही बोलू शकत नाहीत. सोनार बांग्लाला शोनार बांग्ला म्हणत आहेत. रविंद्रनाथ टागोर यांची जन्मभूमी जोडासांकू सांगतात. विद्यासागर यांची मूर्ती तोडतात. गुजरातमधील दंगलीचे नायक आहेत. जर दंगा करतील तर माझ्यात पंगा घेण्याची ताकद आहे”, अशा शब्दात ममता यांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदी यांनाच आव्हान दिलं आहे.

पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार काल थंडावला आहे. 27 मार्च म्हणजे शनिवारी 5 जिल्ह्यातील एकूण 30 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यातील बाकुंडा जिल्ह्यातील, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील 6, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 7, झाडग्राम जिल्ह्यातील 4 तर पुरुलिया जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान शनिवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत असणार आहे.

पहिल्या टप्प्यात सर्व बूथ संवेदनशील

पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होणार आहे. यातील सर्व बूथ संवेदनशील आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 1 हजार 790 मतदान केंद्र आहेत. तर मतदारांची संख्या 73 लाख 80 हजार 942 आहे. सर्व संवेदनशील बूथवर केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात असणार आहेत. तशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. तर मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात पश्चिम बंगाल पोलीस असणार नाहीत. याबाबत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला होता. पण निवडणूक आयोगाने तो फेटाळून लावला.

संबंधित बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधानांना शोधण्यासाठी बंगालला जावं काय? काँग्रेस नेत्याने प्रश्न विचारताच मोदी लोकसभेत हजर!

West Bengal Assam Election Opinion Poll:पश्चिम बंगाल, आसाममध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर

Mamata Banerjee’s Hindu card in the Assembly elections

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.