West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जी SSKM रुग्णालयात दाखल, राज्यभरात TMC कार्यकर्ते रस्त्यावर
4 - 5 लोकांनी जबरदस्तीने त्यांच्या गाडीचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली. हल्ला झाल्यानंतर ग्रीन कॉरिडॉर बनवून ममता बॅनर्जी यांना कोलकातामध्ये आणण्यात आलं आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आरोप केलाय की नंदीग्रामच्या बिरुलिया गावात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 4 – 5 लोकांनी जबरदस्तीने त्यांच्या गाडीचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली. हल्ला झाल्यानंतर ग्रीन कॉरिडॉर बनवून ममता बॅनर्जी यांना कोलकातामध्ये आणण्यात आलं आहे. सध्या त्यांना SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.(Mamata Banerjee admitted to SSKM Hospital in Kolkata)
बॅनर्जी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्वात प्रथम एक्स-रे काढण्यात आला. SSKM रुग्णालयाने 5 सदस्यीय मेडिकल बोर्डची स्थापना केली आहे. त्यात कार्डियोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक, न्यूरो सर्जनसह अन्य तज्ज्ञांचा सहभाग आहे. SSKM रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.
West Bengal CM Mamata Banerjee brought to SSKM Hospital, Kolkata
The CM Banerjee claims she suffered an injury after a few people pushed her at Nandigram pic.twitter.com/UnZVSQVPzT
— ANI (@ANI) March 10, 2021
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी कळताच SSKM रुग्णालयाबाहेर आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वत्र तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांना भेटण्यासाठी राज्यपाल जगदीप धनखडही रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी TMC कार्यकर्त्यांनी गो बॅकच्या घोषणा दिल्या.
अखिलेश यादवांकडून चौकशीची मागणी
ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे. ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याची बातमी चिंताजनक आहे. त्यांना लवकर आराम मिळो ही प्रार्थना. या प्रकरणी तात्काळ एक उच्च स्तरीय समिती स्थानप करुन तपास केला जावा’, असं ट्वीट यादव यांनी केलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्वीट करुन ममता बॅनर्जी यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना केली आहे.
पश्चिम बंगाल की सीएम “दीदी” @MamataOfficial पर नंदीग्राम दौरे के दौरान साजिशन हमला कर उनके पैर को कुचलने का प्रयास घोर निंदनीय!
एक सीएम की सुरक्षा में इतनी बड़ी चूक बेहद गंभीर चिंतनीय विषय है।
संज्ञान ले कठोरतम कार्रवाई करे चुनाव आयोग।
दीदी के जल्द स्वस्थ होने की कामना।
— Samajwadi Party (@samajwadiparty) March 10, 2021
निवडणूक आयोगाने अहवाल मागवला
ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याबाबत निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे. राज्याचे मुख्य सचिव अलापन बॅनर्जी आणि पोलीस महासंचालक नीरज नयन पांडे यांचा तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. दुसरीकडे राज्याच्या गृह विभागानंही जिल्हा प्रशासनाला संपूर्ण घटनेचा तातडीने अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपकडून सीबीआय चौकशीची मागणी
भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ता शमिक भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास करण्याची एक चौकशी समिती नेमण्यात यावी. कारण मुख्यमंत्र्यांची सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्यावेळी पोलीस कर्मचारी का उपस्थित नव्हते? पोलीस दलातील अधिकारीही त्यावेळी का हजर नव्हते? याचा उच्चस्तरीय तपास होणं गरजेचं असल्याचं भट्टाचार्य यांनी म्हटलंय.
#WATCH West Bengal CM Mamata Banerjee shifted to the back seat of her vehicle after she claimed she was pushed by a few people and suffered a leg injury in Nandigram pic.twitter.com/49wTQ5ye5S
— ANI (@ANI) March 10, 2021
संबंधित बातम्या :
Mamata Banerjee admitted to SSKM Hospital in Kolkata