West Bengal Election 2021 : प्रचारबंदीनंतरही ममता बॅनर्जी 2 जाहीर सभा करणार! हे कसं शक्य? वाचा सविस्तर
ममता बॅनर्जी यांनी मेयो रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन केलं. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केलीय. ममता दीदींवर 24 तासाच्या प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली आहे. आयोगाच्या या कारवाईविरोधात ममता बॅनर्जी यांनीही आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. ममता बॅनर्जी यांनी मेयो रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन केलं. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. प्रचारबंदीच्या कारवाईनंतर ममता बॅनर्जी आज दोन जाहीर सभा घेणार आहेत. (Mamata Banerjee will hold 2 campaign rallies after the ban is lifted)
आंदोलनावेळी ममता बॅनर्जींनी जोपासला छंद
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज सकाळी 11 वाजता मेयो रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांनी आंदोलन केलं. यादरम्यान ममता यांनी आपला छंदही जोपासला. आंदोलनाला बसल्यानंतर त्यांना काही चित्र रेखाटली. तृणमूल काँग्रेसने सकाळी पत्र लिहून धरणे आंदोलनासाठी रितसर परवानगी मागितली होती. मात्र, एवढ्या कमी वेळात आंदोलनाला परवानगी देता येणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. अशास्थितीतही ममता बॅनर्जी यांनी सकाळी 11 पासूनच धरणे आंदोलन सुरु केलं होतं
#WATCH | West Bengal CM Mamata Banerjee paints & shows paintings as she sits on dharna at Gandhi Murti in Kolkata, to protest against a 24-hour ban imposed by ECI on her from campaigning from 8 pm of April 12 till 8 pm of April 13 pic.twitter.com/CvKHxTB53d
— ANI (@ANI) April 13, 2021
आज दोन जाहीरसभा करणार
निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना 24 तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. 12 एप्रिल रात्री 8 पासून ते 13 एप्रिल रात्री 8 पर्यंत ममता बॅनर्जी यांना कोणत्याही प्रकारे निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही. निवडणूक आयोगाने लावलेली प्रचारबंदी आज रात्री 8 वाजता उठतेय. त्यानंतर ममता बॅनर्जी रात्री 2 जाहीर सभा घेणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार आज रात्री 10 वाजता संपणार आहे. तत्पूर्वी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत ममता बॅनर्जी बारासात आणि विधाननगर मतदारसंघात 2 सभा घेणार आहेत.
ममता दीदींवर कारवाई का?
निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करत ममता बॅनर्जी यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केलीय. तसंच निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात ममता बॅनर्जी यांच्या काही वक्तव्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलंय.
निवडणूक प्रचारावर 24 तासांची बंदी; ममता बॅनर्जींचे निवडणूक आयोगाविरोधात धरणे आंदोलनhttps://t.co/cBPIPrgYv4#MamataBanerjee | #ElectionCommission | #WestBengalElections2021 | #bjp
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2021
संबंधित बातम्या :
West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, 24 तासांसाठी प्रचारबंदी!
Mamata Banerjee will hold 2 campaign rallies after the ban is lifted