West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल विधानसभेच्या उमेदवारांबाबत भाजपचं मंथन सुरु, ममता बॅनर्जींविरोधात भाजपकडून कोणता चेहरा?

नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजप कोणता चेहरा देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल विधानसभेच्या उमेदवारांबाबत भाजपचं मंथन सुरु, ममता बॅनर्जींविरोधात भाजपकडून कोणता चेहरा?
Suvendu Adhikari and Mamata Banerjee
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 8:38 PM

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील (West Bengal Assembly Election 2021) उमेदवार यादीबाबत भाजपचं मंथन सुरु आहे. भाजपकडून गुरुवारी उमेदवारांची पहिला यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपनं कंबस कसली आहे. त्यादृष्टीने भाजपचे बडे नेते रणनिती आखत आहे. त्यामुळे आता नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजप कोणता चेहरा देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.(Suvendu Adhikari likely to get ticket from BJP against Mamata Banerjee from Nandigram)

ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदु अधिकारी?

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपकडून सुवेंदु अधिकारी यांना रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नंदीग्राममधून ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदु अधिकारी अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सुवेंदु अधिकारी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे टीएमसीच्या नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जीही नंदीग्राममधून निवडणूक लढवू इच्छित आहेत.

शिवसेनेचाही ममतांना पाठिंबा

शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार नाही. सेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं राऊतांनी सांगितलं. ममतादीदी बंगालची वाघीण असल्याचा गौरवही संजय राऊतांनी केला.

“शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अनेक जणांच्या मनात कुतूहल आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला. सद्यस्थिती पाहता ही निवडणूक ‘दीदी विरुद्ध सगळे’ अशी होणार आहे. सर्व एम – मनी (पैसा), मसल्स (शक्ती) आणि मीडिया ‘म’मतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता दीदींना गर्जना करणारे यश चिंतीतो. आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत.” अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

राजद आणि सपाही ममतांच्या पाठीशी

यापूर्वी बिहारमधील विरोधी पक्षनेते आणि राजदचे सर्वेसर्वा तेजस्वी यादव यांनी पश्चिम बंगालमध्ये जात ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजयापासून रोखणं हे एकमेव लक्ष्य असल्याचं यावेळी तेजस्वी यादव म्हणाले होते. तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही रायझिंग यूपी या कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

संबंधित बातम्या :

West Bengal Election 2021 : तेजस्वी यादवांनंतर आता अखिलेश यादवांचंही ममता बॅनर्जींना समर्थन, भाजपला रोखणं शक्य होणार?

West Bengal Election 2021 : लालूंचा आदेश, भाजपला रोखण्यासाठी तेजस्वी यादव पश्चिम बंगालच्या मैदानात!

Suvendu Adhikari likely to get ticket from BJP against Mamata Banerjee from Nandigram

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.