West Bengal Election 2021 : पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 30 जागांसाठी शनिवारी मतदान

बाकुंडा जिल्ह्यातील, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील 6, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 7, झाडग्राम जिल्ह्यातील 4 तर पुरुलिया जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान शनिवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत असणार आहे.

West Bengal Election 2021 : पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 30 जागांसाठी शनिवारी मतदान
पश्चिम बंगाल विधानसभा निवढणुकीत नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांचा प्रचार
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 7:47 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला आहे. 27 मार्च म्हणजे शनिवारी 5 जिल्ह्यातील एकूण 30 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यातील बाकुंडा जिल्ह्यातील, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील 6, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 7, झाडग्राम जिल्ह्यातील 4 तर पुरुलिया जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान शनिवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत असणार आहे.(campaign for the first phase of the West Bengal Assembly elections ended)

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात विविध राजकीय पक्षाचे मिळून एकूण 191 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात 171 पुरुष तर 21 महिला उमेदवारांचा समावेश आहे. आज प्रचाराचा शेवट होण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार प्रचारमोहीम राबवली. भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तृणमूल काँग्रेसकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अन्य नेत्यांनी जोरदार प्रचार केला.

पहिल्या टप्प्यात सर्व बूथ संवेदनशील

पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होणार आहे. यातील सर्व बूथ संवेदनशील आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 1 हजार 790 मतदान केंद्र आहेत. तर मतदारांची संख्या 73 लाख 80 हजार 942 आहे. सर्व संवेदनशील बूथवर केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात असणार आहेत. तशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. तर मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात पश्चिम बंगाल पोलीस असणार नाहीत. याबाबत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला होता. पण निवडणूक आयोगाने तो फेटाळून लावला.

48 उमेदवारांविरुद्ध गुन्ह्याची नोंद

191 उमेदवारांपैरी 48 उमेदवारांविरोधात विविध गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात 42 उमेदवारांविरोधात गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 10, भाजपचे 12, तृणमूल काँग्रेसचे 10 आणि काँग्रेसच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे. 12 उमेदवारांविरोधात महिलांवरील अत्याचार, 8 जणांविरुद्ध हत्या तर 19 जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

संबंधित बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधानांना शोधण्यासाठी बंगालला जावं काय? काँग्रेस नेत्याने प्रश्न विचारताच मोदी लोकसभेत हजर!

West Bengal Assam Election Opinion Poll:पश्चिम बंगाल, आसाममध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर

campaign for the first phase of the West Bengal Assembly elections ended

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.