West Bengal Election 2021 : शुभेंदु अधिकारींचं दोन मतदारसंघातील मतदार यादीत नाव, TMCची कारवाईची मागणी

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांच्यावर TMCकडून गंभीर आरोप करण्यात आलाय.

West Bengal Election 2021 : शुभेंदु अधिकारींचं दोन मतदारसंघातील मतदार यादीत नाव, TMCची कारवाईची मागणी
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 3:14 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा संघर्ष आता चांगलाच जोर धरताना पाहायला मिळतोय. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांच्यावर TMCकडून गंभीर आरोप करण्यात आलाय. अधिकारी यांचं नंदीग्राम आणि हल्दिया अशा दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असल्याचा आरोप आहे.(TMC accuses BJP candidate Shubhendu Adhikari in Nandigram assembly constituency)

तत्पूर्वी, शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही एक आरोप केला होता. ममता यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांच्यावरील काही गुन्हे लपवल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे. त्यानंतर आता TMC कडून अधिकारींवर दोन मतदारसंघातील मतदार यादींमध्ये नाव असल्याचा आरोप केलाय. तसंच निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करण्याची मागणीही TMC कडून करण्यात आली आहे. इतकच नाही तर नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतून अधिकारी यांचं नाव वगळण्याची मागणीही TMCने केली आहे.

डेरेक ओ ब्रायन यांचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

TMC चे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना 2 पत्र लिहिली आहेत. त्यात शुभेंदु अधिकारी यांनी स्वत:चं नाव नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत पार्ट नंबर 76 च्या सिरियल नंबर 669 असल्याचं सांगितलं आहे. अधिकारी यांनी हल्दिया च्या मतदार यादीतून आपलं नाव हस्तांतरित करण्यासाठी अर्जही केला आहे. जो पूर्णपणे चुकीचा असल्याचं डेरेक यांनी पत्रात म्हटलंय.

ममता बॅनर्जींनी शपथपत्रात गुन्हे लपवले?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. प्रचारादरम्यान झालेल्या अपघातानंतर थेट व्हीलचेअरवर बसून ममता बॅनर्जी यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. अशावेळी नंदीग्राममधील भाजपचे उमेदवार शुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केलाय. ममता यांनी उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रावर त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला नसल्याचं अधिकारी यांनी म्हटलंय. तसंच ममता यांनी उमेदवारी रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

West Bengal Election : ममता बॅनर्जींनी शपथपत्रात गुन्हे लपवले? उमेदवारी रद्द करा, भाजप आक्रमक

West Bengal Election 2021 : ‘माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय?’, कोलकात्यात बसून कट रचला जात असल्याचा ममतांचा आरोप!’

TMC accuses BJP candidate Shubhendu Adhikari in Nandigram assembly constituency

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.