West Bengal Election 2021 : पंतप्रधान मोदींकडून आचारसंहितेचा भंग, TMCची निवडणूक आयोगाकडे तक्रार
पंतप्रधान मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा TMCने केलाय. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी TMCच्या नेत्यांनी केलीय.
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेश दौऱ्यात ओराकांडी मतुआ समाजाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यावर तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा TMCने केलाय. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी TMCच्या नेत्यांनी केलीय. पंतप्रधान मोदी आपल्यासोबत पश्चिम बंगालमधून खासदार शांतनु ठाकूर यांना सोबत घेऊन गेले, जे कुठल्याही अधिकार पदावर नाहीत, असा दावाही TMC नेत्यांनी केलाय.(TMC complains to EC that PM Narendra Modi has violated the code of conduct)
पंतप्रधान मोदी यांच्या बांग्लादेशातील मंदिराचा दौऱ्यामागे पश्चिम बंगालमधील मतदारांना प्रभावित करण्याचा उद्देश होता, असा आरोप तृणमूल काँग्रेसनं केलाय. तृणमूल काँग्रेसनं तक्रार दाखल केल्यानंतर निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पंतप्रधान मोदींचा 2 दिवसीय बांग्लादेश दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मार्च रोजी दोन दिवसाच्या बांग्लादेश दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी मतुआ समाजाचं मंदिर ओराकांडीचाही दौरा केला. इतकच नाही तर पंतप्रधान मतुआ समजाचे संस्थापक हरिश्चंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थानावरही गेले होते.
पंतप्रधान मोदी बांग्लादेशच्या 50 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी मतुआ समाजातील लोकांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं होतं की, एखादा भारतीय पंतप्रधान इथं येईल आणि मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा करेल असा विचार कुणीही केला नव्हता.
‘बंगालच्या हिंदू मतदारांना भाजपविषयी तितकसं ममत्व नाही’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपची सर्व मदार पाच गोष्टींवर अवलंबून आहे. मात्र, हे सर्व डावपेच लढवले तरी बंगालमध्ये भाजपला 100 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असा पुनरुच्चार निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये थेट लढत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रसचे कितीही नेते पक्ष सोडून गेले असले तरी त्याचा फटका ममता बॅनर्जींना बसणार नाही, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला.
आधीच कर्जबाजारी, आता पाकिस्तानकडून बालाकोटमध्ये उधारीच्या पैशांवर ‘हा’ महत्त्वकांक्षी प्रकल्पhttps://t.co/jKbtchMV5I#Pakistan #Balakot #Loan
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
संबंधित बातम्या :
VIDEO: ममता बॅनर्जींनी सांगितलं तरी प्रचार करणार नाही; तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँचा पारा चढला
TMC complains to EC that PM Narendra Modi has violated the code of conduct