West Bengal Election : TMC नेते अभिषेक बॅनर्जींच्या रॅली नंतर भाजपच्या सन्मान यात्रेच्या रथावर हल्ला!
भाजपने आरोप केला आहे की, बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रेच्या रथाची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच ड्रायव्हरलाही मारहाण करण्यात आल्याचं भाजपनं म्हटलंय.
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. अशावेळी पुरुलियामध्ये भाजपच्या प्रचार रथाची तोडफोड करण्यात आली आहे. भाजपने आरोप केला आहे की, बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रेच्या रथाची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच ड्रायव्हरलाही मारहाण करण्यात आल्याचं भाजपनं म्हटलंय. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या रॅलीनंतर ही तोडफोड करण्यात आली आहे.(Alleged to have attacked BJP’s campaign chariot by Trinamool Congress workers in West Bengal)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कोतुलपूरमधील प्रचारसभेला संबोधित करणार आहेत आणि इथेच बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रेची सुरुवात ते करणार होते.
अमित मालवीय यांच्याकडून निषेध व्यक्त
भाजपचे केंद्रीय सह प्रभारी अमित मालवीय यांनी ट्वीट करुन या संपूर्ण प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. ‘पुरुलियामध्ये पार्क करण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकर सन्मान रथाची तोडफोड करण्यात आली आहे. ड्रायव्हरही जखमी झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कोतुलपूरमधून या यात्रेला हिरवा कंदिल दाखवणार आहेत. तृणमूल काँग्रेस हे सर्व रोखण्यासाठी खूप काही करण्यात सक्षम नाही. ते एवढे का घाबरत आहेत?’, असं ट्वीट मालवीय यांनी केलंय.
BJP’s rath for the Babasaheb Bhimrao Ambedkar Samman Yatra, parked in Purulia, vandalised. Driver suffered injuries. BJP national president J P Nadda would be flagging off the yatra anytime now from Kotulpur. TMC won’t be able to do much to stop it!
What is Pishi so scared of? pic.twitter.com/8bD8gAzPUC
— Amit Malviya (@amitmalviya) March 16, 2021
राजनाथ सिंह यांची ममता बॅनर्जींवर टीका
ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्याकडून नोकरशाहीवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच कोलकातामध्ये बसून कट रचला जात असल्याचंही ममता यांनी म्हटलंय. त्यावर आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली आहे.
‘मां, माटी और मानुष, कुणीही सुरक्षित नाही’
“ममता यांनी सांगितलं होतं की, ‘मां, माटी और मानुष’! पण आज इथं ना मां सुरक्षित आहे, ना मानुष सुरक्षित आहे, ना पश्चिम बंगालची माती सुरक्षित आहे”, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जींवर टीकास्त्र डागलं. त्यातबरोबर ममता बॅनर्जी या प्रचारादरम्यान अपघातामुळे जखमी झाल्या. त्यांनी भाजपवर आरोप केला. पण तपासात त्यांच्या सुरक्षेत कसूर झाल्यामुळे त्या जखमी झाल्याचं समोर आलं, असंही राजनाथ सिंह म्हणाले.
ममता दीदी ने कहा था मां, माटी और मानुष। आज न मां सुरक्षित है, न मानुष सुरक्षित है और न ही पश्चिम बंगाल की माटी सुरक्षित है।
अभी हाल ही में ममताजी को थोड़ी चोट लगी जिसका आरोप उन्होंने भाजपा पर लगा दिया जबकि एजेंसियों ने कहा है कि उनकी सुरक्षा में कमी की वजह से उन्हें चोट लगी है। pic.twitter.com/QDxyTc6rWs
— Rajnath Singh (@rajnathsingh) March 16, 2021
संबंधित बातम्या :
Alleged to have attacked BJP’s campaign chariot by Trinamool Congress workers in West Bengal