‘या’ पक्षाचं थेट निवडणूक आयोगालाच आव्हान; पक्षातील नेते आक्रमक…
निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. दिल्ली, पंजाब, गुजरात आणि गोव्यात आम आदमी पक्ष हा मान्यताप्राप्त राज्य पक्ष असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
कोलकाता : केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय पक्षाच्या यादीत टीएमसीचा समावेश नसणार. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा टीएमसीने निषेध व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, टीएमसी आता या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कायदेशीर पर्याय शोधत आहे. त्यामुळे टीएमसी आणि सत्ताधारी हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक आयोगाने सोमवारी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक् आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला (आप) दिल्लीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्याने पक्षाचे खासदार सौगता रॉय यांच्याकडून या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
याविषयी त्यांनी सांगितले की, याआधीही टीएमसीने अनेक अडथळे पार केले आहेत. त्यामुळे हा अडथळाही आपण पार दूर करणार आहे.
त्याचबरोबर तृणमूल काँग्रेस यापुढेही असेच काम करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाला काय करायचे आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही असंही तृणमूलच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
तर निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोक दल (RLD) आणि पश्चिम बंगालमधील रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP) या राज्यस्तरीय पक्षाचा दर्जाही काढून घेतला आहे. तर, मेघालयमध्ये द व्हॉईस ऑफ द पीपल पार्टीला राज्य पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
दिल्ली आणि पंजाबमध्ये आपचे सरकार आहे त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. त्याचबरोबर पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तर याच पक्षाचे काही आमदार गुजरात आणि गोव्यातही विजय झाले आहेत.
त्यामुळे त्याच आधारावर निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. दिल्ली, पंजाब, गुजरात आणि गोव्यात आम आदमी पक्ष हा मान्यताप्राप्त राज्य पक्ष असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.