नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं| भात लावताना केला हा एक बदल अन् चमत्कारच झाला, पाहा नेमकं काय झालं?
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात नवीन प्रकारची शेती केली आहे. विशेष म्हणजे या नवीन प्रयोगाचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचा देखील पाहायला मिळत आहे.
बिहार : आजकाल शेतकरी हे नवनवीन प्रकारची शेती करताना दिसतात. शेतकरी त्यांच्या शेतात वेगवेगळे नवीन प्रयोग करत असतात. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. मग कोणतंही पीक असो शेतकरी त्यांच्या शेतात नवीन प्रयोग करताना दिसतात. तर असंच काहीसं पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नरकटियागंज ब्लॉकमधील मुशरवा येथे एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात नवीन प्रकारची शेती केली आहे. विशेष म्हणजे या नवीन प्रयोगाचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचा देखील पाहायला मिळत आहे.
या शेतकऱ्याचे नाव आहे कमलेश. कमलेश यांनी त्यांच्या शेतात रंगीबेरंगी भात पिकांची लागवड केली आहे. मग हिरवे, लाल, निळे, काळे, तपकिरी या रंगांमध्ये कमलेश यांनी भात पिकांची यशस्वी लागवड केली आहे. हे ऐकून तुम्ही चक्कीत झाला असाल पण होय हे खरं आहे.
कमलेश यांनी रंगबेरंगी तांदळाची शेती करण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा येथून रंगीत तांदळाच्या बिया आणल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतात याची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली.या शेतीबाबत कमलेश यांनी सांगितले की, पारंपारिक शेतीपासून दूर जात एक वेगळा प्रयोग म्हणून मी या रंगीबेरंगी भाताची लागवड केली.
या भाताची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली. तसेच या शेतीसाठी खर्च देखील कमी लागला असल्याचा दावा कमलेश यांनी केला. तसेच कमलेश यांना रंगाच्या भारताच्या लागवडीमधून चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नफा देखील झाला आहे. तसेच कमलेश यांच्या रंगीबेरंगी तांदळाची किंमत 150 रुपये ते 200 रुपये प्रति किलो आहे.
आत्तापर्यंत तुम्ही पांढऱ्या रंगाचे तांदूळ पाहिले असेल. पण कमलेश यांनी रंगबेरंगी भात पिकांची लागवड केली आहे. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेमध्ये रंगीबेरंगी तांदळामध्ये खनिजे, जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात आहेत. विशेष सांगायचं झालं तर या रंगीबेरंगी तांदळाचा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदा आहे. कारण हे तांदूळ खाल्ल्यामुळे मधुमेह रुग्णांना खनिजे, जीवनसत्वे मिळतात त्यामुळे ते त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. याबाबतचं तथ्य नरकटियागंज येथील कृषी संशोधन केंद्राने प्रमाणित केले आहे.
कमलेश यांनी त्यांच्या तांदळाच्या लागवडीला चालना देण्यासाठी अनेक क्विंटल धान्य शेतकऱ्यांना मोफत वाटले. तसेच आता कमलेश त्यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या तयारीत आहेत. तसेच त्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा देखील आहे. जेणेकरून ते आणखीन एकापेक्षा जास्त गोष्टींची लागवड करू शकतील. त्यामुळे आता सरकार कमलेश यांना आर्थिक मदत करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.