चंद्रावर उतरण्यापासून उत्पन्नापर्यंत, चंद्रयान ३ शी संबंधित महत्त्वाची माहिती
अमेरिका, रशिया, चीन या देशांनी चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केली. भारतासाठीही आर्थिकदृष्याही हे महत्त्वाचं पाऊल राहणार आहे.
नवी दिल्ली : भारताचे मिशन चंद्रयान ३ चंद्रावर उतरण्यास तयार आहे. चंद्रयान ३ चंद्रावर पोहचून भारताची महत्त्वाकांशा पूर्ण करणार आहे. चंद्राच्या कक्षेत उतरल्यानंतर त्यात लँडर मॉड्यूल आणि रोवरचा समावेश आहे. हे भारताच्या वैज्ञानिक कथेचा इतिहास रचणार आहे. चंद्रयानाचे चंद्रावर तीन महत्त्वाची कामं आहेत. चंद्रावर सुरक्षित लँडिंग, चंद्रावर रोवर उतरणे आणि चंद्रावरील जागेची तपासणी. चंद्रयान ३ ने चंद्रयान २ च्या ऑर्बिटरचा वापर करणे तसेच चंद्रावरील रस्ता तयार करेल. एक वेळा लँडिंग झाल्यानंतर अंधारात असलेल्या चंद्रावरील तपासणी करता येणार आहे. तेथील वातावरणाची तपासणी होईल. अमेरिका, रशिया, चीन या देशांनी चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केली. भारतासाठीही आर्थिकदृष्याही हे महत्त्वाचं पाऊल राहणार आहे.
काय आहे चंद्रावरील अर्थकारण
चंद्रावर जाणाऱ्या महत्त्वाच्या देशात भारताचा समावेश होणार आहे. चंद्रावर लोकांना जाण्याचंही प्लॅनिंग आहे. भविष्यातील युद्ध, संशोधन आणि सुट्टी साजरी करण्यासाठी चंद्रावर जाता येणार आहे. चंद्रावरील वाहतूक हा व्यवसाय मानला जात आहे. चंद्रावरील वाहतुकीचा व्यवसाय हा २०४० पर्यंत ४२ बिलीयन डॉलरपर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज आहे. २०३० ते २०४० पर्यंत चंद्रावर १ हजार एस्ट्रोनॉट राहतील. चंद्रावर संवादाचे नेटवर्क तयार केले जाईल. हे नेटवर्क कोट्यवधी रुपये कमवण्याचे साधन होऊ शकते.
आव्हानं काय आहेत?
योग्य वेळ आणि योग्य वेग आवश्यक
लँडरच्या गतीवर नियंत्रण करावे लागते
गुरुत्वाकर्षणही आहे आव्हान
चंद्रावरील क्रेटर आणि रेजोलीथ
चंद्रयान ३ मध्ये काय आहे?
लेजर आणि आरएफ ऑल्टीमीटर
लेजर डॉप्लर वेलोसीमीटर आणि लँडर हॉरीजान्टल वेलोसीटी कॅमेरा
लेजर जायरो आधारीत इनर्शीयल रेफरेन्सिंग आणि एक्सेलोमीटर पॅकेज
८०० एन लिक्वीड इंजीन, ५८ एन एट्यीट्यूड थ्रस्टर, इंजीन नियंत्रित करणारे उपकरण
नेव्हीगेशन, गाईडन्स आणि कंस्ट्रोलसाठी हार्डवेअर आणि साफ्टवेअर
कॅमेरा आणि एल्गोरीथम