के. कविता यांनी अशी काय कबूली दिली ? की ईडीने लगेच अरविंद केजरीवाल यांना अटक केली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बीआरएस चिफ केसीआर यांची मुलगी के.कविता ईडीच्या ताब्यात आहेत. या ईडीने मनी लॉड्रींग प्रकरणात अटक केली आहे. के.कविता यांच्या अटकेनंतरच केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

के. कविता यांनी अशी काय कबूली दिली ? की ईडीने लगेच अरविंद केजरीवाल यांना अटक केली
k.kavitha and arvind kejriwalImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 3:34 PM

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मनी लॉड्रींगचा तपास करणाऱ्या ईडीने गुरुवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. ईडीने केजरीवाल यांच्यावर ते या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप ठेवला आहे. भारत राष्ट्र समितीच्या ( बीआरएस ) के.कविता यांनी मद्य धोरण ठरविताना केजरीवाल, आप नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या सोबत कट रचल्याचे ईडीने प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.

भारत राष्ट्र समितीच्या के.कविता यांना काही दिवसांपूर्वी ईडीने त्यांच्या घरातून अटक केल्यानंतर त्यांनी रिमांडमध्ये दिलेल्या माहीती आधारे ईडी केजरीवाल यांची चौकशी करीत आहे. के.कविता आणि केजरीवाल यांच्या मद्य धोरण ठरविण्यात जी बोलणी झाली त्या संदर्भात केजरीवाल यांच्याकडून ईडीला उत्तरे हवी आहेत.

ईडीला आपल्या तपासात काय सापडले ?

के. कविता यांच्या अटकेनंतर त्यांनी दिलेल्या कबूली जबाबाआधारे ईडीने केजरीवाल यांच्यावर आरोप केले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, तत्कालिन उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया, के.कविता यांच्या सोबत आपच्या अन्य नेत्यांनी मिळून एक्साईज पॉलिसी तयार करणे आणि तिला लागू करण्याची योजना आखली होती. त्यातून कोट्यवधी रुपये कमविण्याची योजना यांनी आखली होती.

दिल्ली अबकारी धोरणाचे साऊथ कनेक्शन

के. कविता यांच्या अटकेनंतक केजरीवाल यांना केव्हाही अटक होऊ शकते असे म्हटले जात होते. साऊथ लॉबीच्या के. कविता यांच्याद्वारे आलेल्या 100 कोटी रुपयांच्या लाचेचा पक्षासाठी केलेला वापर आणि मनीट्रेल संदर्भातच केजरीवाल यांची चौकशी सुरु आहे. आरोपींपैकी एक विजय नायर नेहमीच केजरीवाल यांच्या कार्यालयात जायचा आणि त्याचा बहुतांशी वेळ तेथेच घालवायचा असे ईडीने म्हटले आहे.

विजय नायर मिडल मॅन

विजय नायर याने मद्य व्यापारी आणि केजरीवाल यांच्या मिडलमॅन म्हणून काम केले आहे. नायर यानेच इंडोस्पिरीटचे मालक समीर महेंद्रू यांची केजरीवाल यांच्याशी ओळख करून दिली होती. जेव्हा यांची बैठक झाली नाही तेव्हा त्याने महेंद्रू आणि केजरीवाल यांचे व्हिडीओ कॉलवर बोलणे करून दिले. यात केजरीवाल यांनी नायर त्यांच्या मुलासारखा असून त्याच्यावर विश्वास असल्याचे म्हटले होते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.