‘Tv9 नेटवर्कमुळे मला माझ लीप उघडावी लागली’; पंतप्रधान नरेंद्र मोदी Tv9 ला उद्देशून नेमकं काय म्हणाले…

मोदींनी भाषणामध्ये काँग्रेस सरकारच्या काळात झालेले भ्रष्टाचार, घोटाळ्यांवरून जोरदार निशाणा साधला. त्यानंतर भाजप सरकारने दोन टर्म केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली आणि भाषण संपताना टीव्ही9 च्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एक अलंकारिक विनोद करत भाषणाची सांगता केली.

'Tv9 नेटवर्कमुळे मला माझ लीप उघडावी लागली'; पंतप्रधान नरेंद्र मोदी Tv9 ला उद्देशून नेमकं काय म्हणाले...
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 10:57 PM

नवी दिल्ली | Tv9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे‘ च्या दुसऱ्या पर्वाचा कार्यक्रम सुरू आहे. आज म्हणजेच सोमवारी दुसऱ्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मोदींनी Tv9 नेटवर्कच्या सर्व भाषेतील वाहिन्यांच्या कामाचं कौतुक केलं. आपल्या संपूर्ण भाषणानंतर मोदी टीव्ही9 नेटवर्कचं नाव घेत असं काही बोलोले की सर्वत्र हास्याचे कारंजे उडालेले पाहायला मिळाले.

TV9 नेटवर्कबाबत मोदी काय म्हणाले?

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच, टीव्ही9 च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि उपस्थितांनाही. मी नेहमीच भारताच्या डायव्हर्सिटीची चर्चा करतो. या डायव्हर्सिटीला टीव्ही9च्या न्यूज रुममध्ये दिसून येते. टीव्ही9च्या अनेक भारतीय भाषात तुम्ही भारताची व्हायब्रंट लोकशाही त्याचे प्रतिनिधीही असल्याचं म्हणत कौतुक केलं. मोदींनी भाषणामध्ये काँग्रेस सरकारच्या काळात झालेले भ्रष्टाचार, घोटाळ्यांवरून जोरदार निशाणा साधला. त्यानंतर भाजप सरकारने दोन टर्म केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली आणि भाषण संपताना टीव्ही9 च्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एक अलंकारिक विनोद करत भाषणाची सांगता केली.

भारत आज ग्लोबल वर्ल्डमध्ये डिजीटल पेमेंट करणारा सर्वात मोठी ताकद आहे. भारत चंद्रमाच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश आहे, फायजीमध्ये युरोपलाही मागे टाकलं आहे. आज भारत उज्वल भविष्यासाठी मेहनत करत आहे. भारत भविष्याकडे पाहत आहे. म्हणूच लोक म्हणत आहेत इंडिया इज फ्युचर. त्यामुळे येणारे पाच वर्ष अत्यंत महत्त्वाची असल्याचं मोदी म्हणाले.

आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आपल्याला भारताच्या सामर्थ्याला नव्या उंचीवर न्यायचं आहे. विकसित भारताची प्रगती करायची आहे. हे प्रगती आणि प्रशस्तीचं काम आहे. तुम्ही बिग लीपचा कार्यक्रम ठेवला. त्यामुळे मलाही माझीा लीप उघडायला संधी मिळाल्याचं मोदी म्हणताच कार्यक्रमाच्या ठिकाणी हास्याचे कारंजे उडाले.

मोदींनी विकासकामांच्या यादीचा वाचला पाढा

आमची सरकार नेशन फर्स्टच्या सिद्धांतावर चालत होतो. आधीच्या सरकारला काम न करणं हे सोपं काम बनलं होतं. अशा वर्क कल्चरमुळे देश कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही देशाच्या हिताचे निर्णय घेतले. जुनी आव्हाने संपुष्टात आणली. आर्टिकल ३७० रद्द केलं. मी सिनेमाबद्दल बोलत नाही. राम मंदिर निर्माण पर्यंत ट्रीपल तलाकच्या अंतापर्यंत महिला आरक्षणापर्यंत वन रँक वन पेन्शन पासून चीफ ऑफ डिफेन्स पर्यंत आम्ही सर्व अर्धवट काम पूर्ण केल्याचं मोदी म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.