लाल आणि निळ्या रंगाच्या रेल्वेमध्ये नेमका काय असतो फरक? अपघातात कुठली ट्रेन सुरक्षित, कोणाचं स्पीड जास्त?
रेल्वेने प्रवास करत असताना तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? तुम्हाला दोन प्रकारच्या ट्रेन दिसतात एक लाल कलरची तर दुसरी निळ्या कलरची, आज आपण त्यातील नेमका फरक समजून घेणार आहोत.
प्रवासासाठी अनेक प्रकारची साधनं सध्याच्या काळात उपलब्ध आहेत. ज्यामध्ये तुमच्या पसर्नल कारपासून ते सार्वजनिक बसेस, ट्रेन आणि विमानापर्यंतची साधनं उपलब्ध आहेत. मात्र तुम्ही जेव्हा लाबं पल्ल्याच्या प्रवासाचा विचार करता तेव्हा ट्रेन हाच सर्वात स्वस्त आणि आरामदायी पर्याय तुमच्या डोळ्यासमोर येतो. तुम्ही जेव्हा दूरवरच्या प्रवासासाठी बसचा विचार करता तेव्हा तिचं तिकीट तर स्वस्त असतं, तुमच्या बजेटमध्ये असंत मात्र प्रवास म्हणावा इतका आरामदायी होत नाही. तर विमानाने तुम्ही काही तासांमध्ये इच्छित स्थळी पोहोचू शकता, मात्र त्याचा दर तुम्हाला परवडेलच असं नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कधीही ट्रेन हाच सर्वात बेस्ट ऑपशन मानला जातो.
मात्र तुम्ही जेव्हा ट्रेननं प्रवास करता तेव्हा तिच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला माहिती असनं गरजेचं आहे. तुम्ही ट्रेनने प्रवास करताना कधी लक्ष दिलं आहे का? रेल्वे स्थानकांवर तुम्हाला दोन प्रकारच्या ट्रेन दिसतात काहींचा कलर हा लाल असतो तर काही या निळ्या कलरच्या असतात त्यामध्ये नेमका काय फरक आहे हे आज आपण जाणून घेणार आहेत.
निळ्या कलरच्या कोचला आयसीएफ म्हणजे (Integral Coach Factory) असं म्हणतात या कोचची निर्मिती ही चेन्नईमध्ये होती. ही भारताची कंपनी आहे. तर लाल कलरच्या कोचला एल एच बी म्हणजेच लिंक हॉब मॅन बूश म्हणतात. ही जर्मनीची कंपनी आहे, आणि या डब्याची निर्मिती कपूरथला इथे केली जाते. निळ्या कलरच्या कोचला इअर ब्रेक पद्धत असते तर लाल रेल्वेला डिस्क ब्रेक असतात. जेव्हा अपघात होतो, तेव्हा निळ्या कलरच्या ट्रेनचं अधिक नुकसान होतं कारण डबे एकमेकांवर चढण्याची शक्यता त्यामध्ये अधिक असते. तर अपघातामध्ये लाल कलरच्या ट्रेनचं कमी नुकसान होतं कारण डबे शक्यतो एकमेकांवर चढत नाहीत. त्यामुळे लाल ट्रेन ही प्रवासासाठी सुरक्षित मानली जाते. निळ्या ट्रेनच्या तुलनेत लाल ट्रेनचा ताशी वेग देखील जास्त असतो.