Seema Haider: सीमा हैदर आणि सचिन यांच्यात खोली नंबर 204 मध्ये काय घडलं? त्या सात दिवसांची होणार उकल!

सीमा हैदर आणि सचिन यांच्यातील प्रेम कहाणी आता वेगळ्याच वळणावर आली आहे. एटीएसच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा अलर्ट झाली आहे.

Seema Haider: सीमा हैदर आणि सचिन यांच्यात खोली नंबर 204 मध्ये काय घडलं? त्या सात दिवसांची होणार उकल!
Seema Haider: सीमा हैदर हीने केलेला दावा निघाला खोटा, खोली नंबर 204 मध्ये नेमकं काय घडलं? वाचा
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 5:53 PM

मुंबई : पाकिस्तानातील सीमा हैदर आणि सचिनचं प्रेम प्रकरण आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलं आहे. या लव्ह स्टोरीच्या क्लायमॅक्सवरून आता पडदा दूर होऊ लागला आहे. सीमा हैदर चौकशीत धक्कादायक माहिती उघड करत आहे. त्यामुळे तपास यंत्रणाही आवाक् झाल्या आहेत. सीमा आणि सचिनचं प्रेमप्रकरणाबाबत टीव्ही 9 भारतवर्षने एक मोठा खुलासा केला आहे. सीमा आणि सचिन यांनी नेपाळच्या पशुनाथ मंदिरात लग्न केल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे. सीमा आणि सचिन थांबलेल्या विनायक हॉटेमधून ही माहिती समोर आली आहे. हॉटेल मालक गणेस यांनी टीव्ही 9 भारतवर्षला ही माहिती दिली आहे.

खोली नंबर 204 मध्ये काय घडलं?

खोली नंबर 204 मध्ये सचिनने सीमासोबत लग्न केलं असल्याचं समोरा आहे. हॉटेल मालक गणेश यांनी सांगितलं की, “सचिनने खोली बूक केली होती. सचिन नेपाळमध्ये एक दिवस आधी आला होता. त्यानंतर सीमा तिथे पोहोचली. दोघं हॉटेलमध्ये 7 दिवस थांबले. या दरम्यान एकत्र फिरायचे. दोघं जेव्हा बाहेर जायचे तेव्हा सीमा जीन्स आणि टी शर्टमध्ये असायची. त्यामुळे ती चार मुलांची आई असेल याबाबत शंका आली नाही.”

“हॉटेलच्या खोलीतच दोघांचं लग्न झालं. सचिनने सीमासोबत लग्न केलं. सीमाने पशुपतीनाथ मंदिरात लग्न केलच नाही. ती भारतातील तपास यंत्रणांना खोटं सांगत आहे.”, असंही हॉटेल मालक गणेश यांनी सांगितलं.

सीमा हैदर प्रकरणात महत्त्वाचे खुलासे होत आहे. तपास यंत्रणानी या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. सीमा भारतात येणं ह्यूमन ट्रॅफिकिंग सारखीच पद्धत असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं. यासाठी तिला ट्रेनिंग दिली असावी असा संशय तपास यंत्रणांना आहे. नेपाळमधून भारतात येण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेतली असावी, असंही तपास यंत्रणांना वाटत आहे.

सीमाला भारतात पाठवण्यासाठी त्या पद्धतीने ड्रेसअप केल्याचंही समोर आहे. इतकंच काय तर सीमा सोबत चार मुलांना यासाठी खास प्रशिक्षण दिलं असावं, असा संशय तपास यंत्रणांना आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.