मोदींची झाली एनडीएच्या नेतेपदी निवड, सर्वांनी टाळ्यांचा एकच केला कहर, मग नितीन गडकरी यांचा हा व्हिडिओ का होत आहे व्हायरल
Nitin Gadkari Viral Video : NDA सदस्यांच्या बैठकीत घटक दलासह भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी झाले. पण यामध्ये नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत, काहींनी ते नाराज असल्याची चर्चा सुरु केली आहे.
एनडीए सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येत आहे. शुक्रवारी नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी घटक दलातील नेत्यांसह भाजपचे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते. यामध्ये नितीन गडकरी यांचा पण समावेश होता. विरोधी पक्षातील नेते सुद्धा गडकरी यांच्या कौतुकाचे पूल बांधतात. 7 जून सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक झाली. त्यातील एका व्हिडिओची सध्या समाज माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. नेमकं प्रकरण तरी काय आहे?
काय आहे या व्हिडिओत?
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत, NDA बैठकीसाठी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये घटक पक्षातील नेत्यांसह भाजपचे अनेक दिग्गज दिसतात. बैठकीत नरेंद्र मोदी यांना एनडीएच्या नेतेपदी निवडीची घोषणा करण्यात येते. घोषणा होताच सर्वच उपस्थित नेते जागेवर उभे राहुन टाळ्यांचा कडकडाट करतात. काही जण मोदींचा जयकारा करताना दिसतात. पण नितीन गडकरी जागेवरच बसलेले दिसतात. ते टाळी सुद्धा वाजवताना दिसत नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
नितिन गडकरी सोशल मीडिया पर ट्रेंड कर रहे हैं, कल NDA की बैठक में उनका व्यवहार हर तरफ चर्चा का विषय बना हुआ है!#NitinGadkari #NarendraModi #NDA pic.twitter.com/8UIpp6YQLn
— 🇮🇳 Vishal JyotiDev Agarwal 🇮🇳 (@JyotiDevSpeaks) June 8, 2024
प्रत्येकाचा तर्क वेगळा
या व्हिडिओत सेंट्रल हॉलमधील नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा एकच जल्लोष, आनंद साजरा करताना दिसत आहे. कोणी बाकं वाजवताना तर कोणी घोषणा देताना दिसत आहे. मोदींच्या नावाची घोषणा होताच अनेक जण जागेवरच उभे राहुन अभिवादन करताना दिसतात. पण नितीन गडकरी एकाच जागी शांतपणे हा सोहळा पाहताना दिसतात. त्यावरुन प्रत्येक जण वेगवेगळा अर्थ काढत आहे. कुणी ते नाराज असल्याचे सांगत आहेत, तर काही तब्येत ठिक नसल्यामुळे ते जागेवरुन उठले नसल्याचा दावा करत आहेत.
#WATCH केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा, “पिछले 10 साल में उनके(PM मोदी) नेतृत्व में कार्य करने का सौभाग्य हमें मिला हमारा देश सुखी हो संपन्न हो समृद्ध हो विश्व की महाशक्ति बने और समाज के सर्वांगिन क्षेत्र में उन्नति और विकास हो इसके लिए समर्पित भाव से उन्होंने(पीएम नरेंद्र… pic.twitter.com/3Z6wGuLxzi
— ANI_HindiNews (@AHindinews) June 7, 2024
काय म्हणाले नितीन गडकरी?
NDA बैठकीत सहभागी झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी पण त्यांचे मत व्यक्त केले. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात मी काम केले आहे. आपला देश सुखी व्हावा, संपन्न आणि समृद्ध व्हावा, जागतिक महासत्ता व्हावा यासाठी त्यांनी समर्पणाने काम केले आहे. त्यांनी देशालाच नाही तर जगाला प्रभावित केले आहे. येणाऱ्या पाच वर्षांत भारत एक महाशक्ती म्हणून उदयास येईल, अशी स्तूती सुमनं त्यांनी उधळली. मोदींना शुभेच्छा दिल्या.