Politics : सत्तापरिवर्तन झाले तर काय?, नितीश कुमार यांनी सांगितला ‘प्लॅन’
बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यानच्या काळात, पटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झाले होते
मुंबई : लोकसभा निवडणुकांना अवधी असला तरी (Political Leader) राजकीय नेते या निवडणुकांवरुन वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. मध्यंतरी ओवेसी यांनी देशातील सर्व विरोधक एकवटले तर 2024 मध्ये परिवर्तन शक्य होईल असा विश्वास व्यक्त केला होता. आता (Bihar CM) बिहारचे मुख्यमंत्री यांनी तर नवाच दावा केला आहे. 2024 मध्ये सत्तापरिवर्तन झाल्यास बिहारसह मागासलेल्या राज्यांना विशेष दर्जा दिला जाईल. यामाध्यमातू या मागास राज्यांचा विकास साधला जाईल, असेही ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षापासून (Nitish Kumar) नितीश कुमार हे या विशेष दर्जा देण्याची मागणी करीत आहेत. पण सत्तापरिवर्तन झाल्यावरच हे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र
बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही केली होती. त्याचवेळी विशेष दर्जा मिळाला असता तर राज्याच्या विकास कामांना गती मिळाली असती. पण त्यांचे सरकार हे कामासाठी नाही तर पक्षाच्या प्रचारासाठी राबत असल्याचे नितीश कुमार म्हणाले.
उपमुख्यमंत्र्यांनाही टोला
पाटणा येथे विविध विकास कामांचे उद्घाटन झाल्यानंतर नितीश कुमार उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनाही टोला लगावला. त्यांच्याकडे वेळीच पंतप्रधान मोदींनी लक्ष दिले नाही, तर आज वेगळी परस्थिती असती असेही ते म्हणाले आहेत. योग्य वेळी निर्णय घेऊन त्यांच्या सरकारमधून बाहेर पडलो हेच त्यांना सांगायचे होते.
सौर पथदिवे योजनेचा शुभारंभ
पाटणा येथे बिहार राज्य सरकारच्या माध्यमातून सौर पथदिवे योजनेचा प्रारंभ कऱण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह जेडीयू पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाय आपला पक्ष कायम बिहारच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले आहेत.