TV9 च्या WITT कार्यक्रमाला PM Modi करणार संबोधित, काय बोलणार? या लिंकवर पाहा लाइव्ह
TV9 WITT 2025 : दिल्लीतील प्रख्यात भारत मंडपममध्ये 'व्हाट इंडिया थिंक्स टुडे 2025' च्या महामंचावर विचारांचं सोनं लुटलं जाणार आहे. देशातील सर्वात मोठं नेटवर्क असलेल्या टीव्ही9च्या या समारोहात साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाग घेणार आहेत.

देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क टीव्ही9चं ग्लोबल समिट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’चं तिसरं पर्व 28 मार्च 2025 पासून म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे. टीव्ही9 के या वार्षिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाग घेणार आहेत. मोदी यांच्याशिवाय टीव्ही9च्या या अविस्मरणीय कार्यक्रमता केंद्रीय मंत्र्यांसह पाच राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत.
What India Thinks Today Global Summit 2025 चं आयोजन दिल्लीच्या भारत मंडपममध्ये करण्यात आलं आहे. टीव्ही9 नेटवर्कचा हा महामंच राजकारणासह बिझनेस, मनोरंजन, आरोग्य, संस्कृती आणि खेळांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर गहन मंथन करणार आहे.
कुठे पाहाल सोहळा
‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे 2025’चा इव्हेंट टीव्ही9 मराठीच्या ऑफिशियल यूट्यूब अकाऊंटवर तुम्ही पाहू शकता. यूट्यूबवरून तुम्हाला टीव्ही9 मराठीच्या साईटवर हा सोहळा सहज दिसेल. तसेच टीव्ही9 मराठीच्या लाइव्ह टीव्हीच्या लिंकवरही तुम्हाला हा सोहळा थेट लाईव्ह पाहता येणार आहे.
मोदी काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी टीव्ही9 नेटवर्कच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशाचा विकास, विकसित भारत आणि ग्लोबल स्तरावरील भारताची भूमिक या मुद्द्यांवर मोदी बोलतील असं सांगतिलं जात आहे.
बड्या नेत्यांची उपस्थिती
‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे 2025’ च्या महामंचाची शोभा वाढवण्यासाठी या इव्हेंटमध्ये केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही सामील होणार आहेत.
गेल्या वर्षी 25 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारी रोजी न्यूज ग्लोबल समिट व्हाट इंडिया थिंक्स टुडेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यानंतर मोदी नोव्हेंबर 2024मध्ये टीव्ही9च्या जर्मनीमधील न्यूज9 च्या ग्लोबल समिटमध्ये सामील झाले होते. यावेळी त्यांनी एका इव्हेंटमध्ये भाषणही केलं होतं. त्यांचं हे भाषण अविस्मरणीय ठरलं होतं.