WITT 2025 : TV9च्या WITT समिटचा दुसरा दिवस, तेजस्वी यादव ते धीरेंद्र शास्त्री, अनेक दिग्गज लावणार हजेरी
टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2025 चा आज ( शनिवार) दुसरा दिवस आहे. यावेळी राजकारण, आरोग्य सेवा, शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजही सहभागी होणार आहेत. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि चिराग पासवान यांसारखे अनेक दिग्गज आज उपस्थित राहणार आहेत.

‘टीव्ही 9’चा वार्षिक कार्यक्रम असलेला ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिटचा आज (शनिवार) दुसरा दिवस आहे. समिटच्या दुसऱ्या दिवशी देशातील अनेक क्षेत्रातील दिग्गज यात सहभागी होणार आहेत. हाँ कार्यक्रम सकाळी 9:55 वाजता सुरू होणार असून सर्वप्रथम वेलकम स्पीच ( स्वागतपर भाषण) होईल. आजच्या इव्हेंटमध्ये बिहारचे नेते तेजस्वी यादव, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यासह अनेक क्षेत्रातील दिग्गज नेत्यांचा समावेश असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 समिटच्या पहिल्या दिवशी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी अनेक क्षेत्रांवर चर्चा केली. पंतप्रधान म्हणाले, भारत जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. 70 वर्षांपासून, भारत 11 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, मात्र गेल्या 10 वर्षांतच देश 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. या समिटसाठी पंतप्रधान मोदी यांनी TV9 नेटवर्कचे अभिनंदन केले.
आजचं शेड्यूल कसं ?
या समिटच्या दुसऱ्या दिवसाची, आजची सुरुवात सकाळी 9.55 वाजता स्वागतपर भाषणाने होईल. यानंतर सकाळी 10 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्षे साजरी होणार आहे. 10:30 वाजता – पंडित धीरेंद्र शास्त्री या समिटमध्ये सहभागी होतील. तर दुपारी 12 वाजता गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे टीव्ही9च्या मंचावरून संपूर्ण देशाला संबोधित करतील.
हे दिग्गज होणार सहभागी
दुपारी 12.30 वाजता केंद्रीय मंत्री किशन रेड्डी बोलणार आहेत. यानंतर, या कार्यक्रमात उद्योग जगताचा एक मोठा चेहरा असलेले उद्योगपती, अनिल अग्रवाल विकसित भारताबद्दल बोलणार आहेत. दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी डॉ. नवनीत सलुजा इंडिया हेल्थ 2030 विषयी त्यांचे विचार मांडतील.
या समिटमध्ये आरोग्यापासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रावर चर्चा होणार आहे. डॉ. केटी माहे दुपारी 1:45 वाजता इंडिया लर्निंग टू लीड या विषयावर बोलतील. त्यानंतर दुपारी 2:00 वाजता शाहिद अब्दुल्ला हे मंचावरून ग्लोबल साऊथ संदर्भात भाषण करतील. बिहारच्या राजकारणातील उदयोन्मुख नेते चिराग पासवान यांचे दुपारी 3 वाजता कार्यक्रमात भाषण होणार आहे. यानंतर दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी आपका सरदार कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता भाजपच्या कमलक्रांती, तर 4:30 वाजता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी TV9 च्या व्यासपीठावरून एक देश, एक कायदा या विषयावर संपूर्ण देशाला संबोधित करतील. सायंकाळी 5 वाजता केंद्रीय मंत्री पियुष गोयल विश्वगुरु काउंटडाऊनबद्दल बोलतील.
5 ते 8 पर्यंतचं शेड्यूल
यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव संध्याकाळी 5.30 वाजता तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव संध्याकाळी 6 आणि त्यानंतर स्मृती इराणी 6:30 वाजता देशाला संबोधित करतील. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा संध्याकाळी ७ वाजता उपस्थित राहणार आहेत. बिहारचे आरजेडी नेते तेजस्वी यादव हेही संध्याकाळी साडेसात वाजता शिखर परिषदेचा भाग असतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यासह हा इव्हेंट आज पूर्ण होईल.