What India Thinks Today | स्टार्ट इकोसिस्टम सूसाट, FMCG चा पण वाढला वाटा, दिग्गजांचे अनुभव ऐका
What India Thinks Today | व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचे हे दुसरे वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या महासंमेलनात अनेक दिग्गज हजेरी लावणार आहे. उद्योग विश्वातील उद्योजक, सीए, कंपन्यांचे सीईओ, संचालक या कार्यक्रमात सहभागी होतील. ते त्यांचे अमूल्य विचार मांडतील.
नवी दिल्ली | 25 February 2024 : भारत सरकार स्टार्टअप इकोसिस्टमवर लक्ष देत आहे. त्यासाठी विविध उपाय योजना आणि सवलती देण्यात येत आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून भारतात युनिकॉर्न स्टार्टअपची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तर काही स्टार्टअप लवकरच शिखरावर पोहचणार आहे. यामध्ये FMCG क्षेत्र पण मागे नाही. यामध्ये जोरदार वाढ दिसून आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला या क्षेत्राने मोठा हातभार लावला आहे. या क्षेत्रात पण अनेक मोठ्या बदलाची नांदी समोर आली आहे. देशातील क्रमांक 1 न्यूज नेटवर्क TV9 च्या What India Thinks Today संमेलनात नो ब्रोकरचे सहसंस्थापक अखिल गुप्ता आणि जायडस वेलनेसचे सीईओ तरुण अरोरा या बदलांची नांदी नोंदवतील. विचार मांडतील.
‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ च्या पहिल्या दोन दिवसात ‘ग्लोबल समिट’चे आयोजन करण्यात येणार आहे. तर या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारी रोजी ‘सत्ता सम्मेलन’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षातील दिग्गज नेते हजेरी लावतील.
कोण आहेत अखिल गुप्ता ?
गेल्या वर्षी मार्च महिन्यात गुगलने नो-ब्रोकरमध्ये 5 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती. त्याची माहिती नो-ब्रोकरचे सहसंस्थापक अखिल गुप्ता यांनी दिली होती. ते जगातील सर्वात मोठ्या C2C रिअल इस्टेट प्लेटफॉर्म NoBroker.com चे CTO पण आहेत. अखिल यांनी IIT मुंबईतून बी. टेक आणि एम.टेक या दोन पदव्या मिळवल्या. त्यांनी NoBroker.com चे सह संस्थापक होण्यापूर्वी Oracle आणि PeopleFluent सोबत कम केले आहे. या ब्रोकर कंपनीची स्थापना अखिल गुप्ता, आयआयटी कानपूरचे अमित कमार आणि सौरभ गर्ग यांनी मिळून केली होती. अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी या फर्मवर विश्वास टाकला आहे. यामध्ये गुगल, जनरल अटलांटिक, टायगर ग्लोबल, इलिव्हेशन कॅपिटल, मूर स्ट्रेटेजिक व्हेंचर्स, बीनेक्सट, बीनोज आणि केटीबी व्हेंचर्सचा यामध्ये समावेश आहे.
जायडस वेलनेसचे सीईओ तरुण अरोरा
अरोडा जायडस वेलनेस लिमिटेडचे सीईओ तरुण अरोरा हे संचालक पदी आहेत. अरोडा जायडस वेलनेस प्रोडक्ट्स लिमिटेडच्या बोर्डामध्ये सहभागी आहेत. त्यापूर्वी ते गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडमध्ये कार्यकारी उपाध्यक्ष-मार्केटिंग पदावर होते. जायडस वेलनेस ही एक भारतीय कंझ्युमर प्रोडक्ट कंपनी आहे. ही कंपनी हेल्थ फूड, पोषण आणि स्कीन केअर प्रोडक्ट्सचे उत्पादन, विपणन आणि वितरण करते.