What India Thinks Today | कसा असेल विकसीत भारत! ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रेखाटणार चित्र

What India Thinks Today | 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' च्या ग्लोबल समिटमध्ये विचारांची शिदोरी अनेकांना तृप्त करणार आहे. 25 फेब्रुवारीपासून या संमेलनाचा श्रीगणेशा झाला आहे. अनेक विचारवंतांनी त्यांच्या विविध विषयातील नवनवीन कल्पना समोर आणल्या आहेत. उद्या होणाऱ्या सत्ता संमेलन पण खास आकर्षण आहे.

What India Thinks Today | कसा असेल विकसीत भारत! ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रेखाटणार चित्र
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 10:34 AM

नवी दिल्ली | 26 February 2024 : देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिट 2024 ची धडाक्यात सुरुवात झाली. अनेक मान्यवरांनी त्यांचे विचारपुष्प गुंफले आहे. त्यांच्या नवनवीन कल्पनांनी, विचारांनी नवीन आयाम समोर आले आहेत. विचारांची भूक भागविणारे हे समिट अनेक अंगांनी वैचारिक खाद्य पुरविणारे ठरले आहे. या संमलेनाचा आज दुसरा दिवस, आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. . ते विकसित भारताचं स्वप्न या विषयावर बोलणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारताचा जागतिक पटलावर डंका वाजत आहे. त्यापार्श्वभूमीवर हे भाषण विचारांची शिदोरी ठरेल.

  • टीव्ही9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ चे संमेलन 25 फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे. ते 27 फेब्रुवारीपर्यंत सुरु असेल. India: Poised For The Next Big Leap या संकल्पनेवर संमेलन आधारीत आहे.ग्लोबल समिटच्या या मंचावर आज 26 फेब्रुवारी रोजी सिनेमा, आरोग्य, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीशी संबंधित महत्वपूर्ण सत्रांची रेलचेल आहे.
  • ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या संमेलनात 27 फेब्रुवारी रोजी देशातील राजकीय सध्यस्थिती आणि आगामी लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा झडेल. नवीन भारताची गॅरंटी-2024 ही या सत्ता संमेलनाची थीम आहे. ग्लोबल समीटच्या दुसऱ्या दिवशी (सोमवार) आणि मंगळवार (27 फेब्रुवारी) रोजी अनेक दिग्गज सहभागी होत आहे.

‘मोदी है तो गारंटी है’

अर्थात सध्या सर्वदूर ‘मोदी है तो गारंटी है’, हा हुंकार भाजप, नेते आणि दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी भरताना दिसत आहे. सत्ता संमेलनात याच विषयावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांची बाजू मांडतील. मोदी सरकारने गेल्या 10 केलेल्या विविध कामाचा लेखाजोखा, कल्याणकारी योजनांची उजळणी या मंचावरुन होईल. लोकसभेचा बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष सध्या पक्षाची ध्येयधोरणे मांडत आहे. केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान याविषयी भूमिका मांडतील.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधानांचं मुख्य भाषण

संध्याकाळी विकसीत भारताचे स्वप्न यावर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण ऐकणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता आपल्याशी संवाद साधणार आहेत. ते विकसित भारताचं स्वप्न या विषयावर बोलणार आहेत.

अमित शाह पण होतील सहभागी

तीन दिवस चालणाऱ्या कॉनक्लेव्हमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीएम अरविंद केजरीवाल, एलजी मनोज सिन्हा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सारखे दिग्गज नेता सहभागी होत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर पण सहभागी होतील. नवीन भारताच्या जगरहाटीत हरियाणाचे योगदान काय याची भूमिका मांडणार आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.