What India Thinks Today | 2024मध्ये केंद्रात कुणाची सत्ता?; काँग्रेस नेत्याचं परखड मत काय ?

What India Thinks Today | देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 च्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे'च्या 'सत्ता संम्मेलन'मध्ये काँग्रेस नेते पवन खेडा यांच्यानंतर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील उपस्थित असतील. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचं प्रदर्शन निराशाजनक होतं. आता येत्या निवडणुकीत हा पक्ष INDIA आघाडीसोबत चांगली कामगिरी करू शकेल का यावर ते मत मांडतील.

What India Thinks Today | 2024मध्ये केंद्रात कुणाची सत्ता?; काँग्रेस नेत्याचं परखड मत काय ?
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 11:39 AM

नवी दिल्ली | 23 February 2024 : देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 हे ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ यासह सलग दुसऱ्या वर्षी तुमच्या भेटीसाठी सज्ज आहे. या व्यासपीठावर राजकारणातील अनेक दिग्गजांसोबतच, क्रीडा, चित्रपट, अर्थशास्त्र आणि इतर क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीही उपस्थित राहणार आहेत. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे कॉन्क्लेव्ह’च्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या ‘सत्ता संमेलन’मध्ये देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या तयारीवर चर्चा होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती काय आहे, निवडणुकीसाठी पक्षाची तयारी कशी सुरू आहे, इत्यादी मुद्यांवर महत्वपूर्ण आणि सखोल चर्चा होऊ शकते.

देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या ‘सत्ता संम्मेलन’मध्ये काँग्रेसचे मीडिया प्रमुख पवन खेडा हेदेखील सहभागी होणार आहेत. ‘2024 मध्ये कोणाची सत्ता ? ’ या सत्रात पन खेडा हे आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल त्यांचं परखड मत मांडणार आहेत. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेस पक्षाचे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता किती ? काँग्रेस पक्ष कोणत्या तयारीनिशी लोकसभा निवडणुकीत उतरेल, यासंदर्भात काँग्रेसचे नेते पवन खेडा त्यांचं मत मांडतील.

निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज ?

केंद्रात गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA सरकारचा पराभव करण्यासाठी स्थापन झालेली विरोधी पक्षांची INDIA आघाडी किती ताकदीने निवडणूक लढवेल ? INDIA आघाडीतील जागावाटपाला होणार विलंब आणि त्यावरून होणार वाद, या सर्वांदरम्यान काँग्रेस पक्षाची स्वत:ची ( निवडणुकीसाठी) किती तयारी झाली आहे, या सर्व मुद्यांवर पवन खेडा हे त्यांचं मत व्यक्त करतील. ‘सत्ता संमेलन’मध्ये विरोधी पक्षातील अनेक नेते सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकांबाबत जोरदार विचार मंथन होण्याची शक्यता आहे.

‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे जगभरातील तज्ज्ञ व्यक्ती त्यांचं मत स्पष्टपणे मांडतात. सत्ता संमेलन मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ‘ए ब्रेव्ह न्यू इंडिया’ या सत्रात सहभागी होणार आहेत. सीमेवर शेजारील देशांकडून येणाऱ्या आव्हानांना लष्कर कसं तोंड देतं, याबद्दलही ते बोलणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेही होणार सहभागी

राजधानी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये होणाऱ्या टीव्ही9 नेटवर्कच्या या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी सत्ता संमेलनमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित असतील. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचं प्रदर्शन निराशाजनक होतं. आता येत्या निवडणुकीत हा पक्ष INDIA आघाडीसोबत चांगली कामगिरी करू शकेल का यावर ते मत मांडतील. या व्यासपीठावर अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील सहभागी होतील. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या रणनितीबद्दल, तयारीबद्दल रुपरेषा ते मांडण्याची शक्यता आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....