What India Thinks Today | ‘मोदी है तो गारंटी है’ चा नारा किती दमदार; सांगतील केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

What India Thinks Today | भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात एनडीए सलग तिसऱ्यांदा विजयासाठी मैदानात उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी 400 पारचा नारा दिला आहे. ते प्रत्येक सभेत मोदीची गॅरंटी हा हुंकार भरत आहेत.

What India Thinks Today | ‘मोदी है तो गारंटी है’ चा नारा किती दमदार; सांगतील केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 9:57 AM

नवी दिल्ली | 25 February 2024 : टीव्ही 9 नेटवर्क आपला वैचारिक मंच व्हाट इंडिया थिंक्स टुडेच्या (What India Thinks Today) माध्यमातून विचारांचे सकस खाद्य पुरवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ च्या पहिल्या दोन दिवसात ‘ग्लोबल समिट’चे आयोजन करण्यात येणार आहे. तर या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारी रोजी ‘सत्ता सम्मेलन’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध पक्षातील दिग्गज नेते सहभागी होत आहे. केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान हे पण या कार्यक्रमात सहभागी होतील. मोदी सरकारची यशोगाथा आणि निवडणुकीतील रणनीतीविषयी ते महत्त्वाची भूमिका मांडतील.

‘मोदी है तो गारंटी है’

अर्थात सध्या सर्वदूर ‘मोदी है तो गारंटी है’, हा हुंकार भाजप, नेते आणि दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी भरताना दिसत आहे. सत्ता संमेलनात याच विषयावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांची बाजू मांडतील. मोदी सरकारने गेल्या 10 केलेल्या विविध कामाचा लेखाजोखा, कल्याणकारी योजनांची उजळणी या मंचावरुन होईल. लोकसभेचा बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष सध्या पक्षाची ध्येयधोरणे मांडत आहे. केंद्रीय मंत्री पण त्यावरच भूमिका स्पष्ट करतील.

हे सुद्धा वाचा

NDA 400 पार

  • भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात एनडीए गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत आहे. सलग तिसऱ्यांदा महाविजय साजरा करण्याच्या तयारीत हा पक्ष आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 400 पारचा नारा दिला आहे. भाजप आणि नेते प्रत्येक सभेत ‘मोदी है तो गारंटी है’ चा हुंकार भरत आहेत. या नाऱ्याविषयी आणि पक्षाच्या दुणावलेल्या आत्मविश्वासाविषयी प्रधान पक्षाची बाजू मांडतील.
  • प्रत्येक ठिकाणी पीएम मोदी, ‘ जेव्हा लोकांची आशा मावळते, तेव्हा मोदीची गॅरंटी’ सुरु होते, असे जाहीर करतात. गुजरातमधील नवसारीतील सभेत पण त्यांनी हाच हुंकार भरला होता. गरीबांना आता विश्वास आला आहे की, त्यांना पक्के घर मिळेल, त्यांना उपाशी पोटी झोपावे लागणार नाही, कारण ही मोदींची गॅरंटी असल्याचे ते म्हणाले होते.

अमित शाह पण होतील सहभागी

तीन दिवस चालणाऱ्या कॉनक्लेव्हमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीएम अरविंद केजरीवाल, एलजी मनोज सिन्हा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सारखे दिग्गज नेता सहभागी होत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर पण सहभागी होतील. नवीन भारताच्या जगरहाटीत हरियाणाचे योगदान काय याची भूमिका मांडणार आहेत.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.