टीवी9 नेटवर्कचा वार्षिक कार्यक्रम WITT ग्लोबल समिटमध्ये हिंदी व तेलुगू भाषांमधील चित्रपटांत काम करणारे दिग्गज लोक आले. प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम आली. त्याचवेळी दक्षिणात्य चित्रपट अभिनेते तथा निर्माते विजय देवरकोंडा आले. उद्योग, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले. यावेळी तरुणांमध्ये लोकप्रिय असेलेले अभिनेता विजय देवरकोंडा यांनी TV9 च्या एका खास कार्यक्रमात त्यांचा आगामी ‘साम्राज्य’ या चित्रपटाचे प्रमोशन केले.
विजय देवरकोंडा याला सुपरस्टार्सचे कोलाबोरेशन किती आव्हानात्मक होते? याबद्दल विचारण्यात आले. यावर तो म्हणाला की, या चित्रपटासाठी फक्त ज्युनियर एनटीआरचा आवाज आवश्यक आहे हे मला सुरुवातीपासूनच माहीत होते. कारण फक्त तोच त्याला न्याय देऊ शकतो. मी त्यांच्याकडे गेलो आणि विनंती केली. त्यांनी मला त्यांच्या जवळ बसवले.
त्यानंतर ते म्हणाले, आज संध्याकाळी करू. चित्रपटाचा दिग्दर्शकही नव्हता. मात्र त्यानंतरही ज्युनियर एनटीआर यांनी सर्व काही ठीक होईल, असे आश्वासन मला दिले. तसेच मार्गदर्शनही केले. ज्युनियर एनटीआर खूप उत्साही होते. त्यांनी खूप चांगले डब केले.
रणबीरबद्दल बोलताना विजय म्हणाला, रणबीर कपूर माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे चित्रपट बघतच मी मोठा झालो आहे. मी नुकताच रणबीरला मेसेज केला होता. त्यात मला काय काम आहे तेही सांगितले नव्हते. पण त्याला डबिंगबाबत माहिती होती. माझा मेसेज मिळताच त्याने हो म्हटले. यानंतर मी त्याला कॉल केला आणि टीझरची माहिती शेअर केली.