Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Batla House Encounter Case: ‘तारीख पे तारीख’, कधी बदनामी तर कधी न्यायालयीन विजय, काय आहे बाटला हाऊस चकमक?

देशभरात गाजलेली दिल्ली पोलिसांची बाटला हाऊस (Batla House) येथील कारवाई आणि झालेल्या चकमक प्रकरणी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय सुनावलाय.

Batla House Encounter Case: 'तारीख पे तारीख', कधी बदनामी तर कधी न्यायालयीन विजय, काय आहे बाटला हाऊस चकमक?
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 3:19 AM

नवी दिल्ली : देशभरात गाजलेली दिल्ली पोलिसांची बाटला हाऊस (Batla House) येथील कारवाई आणि झालेल्या चकमक प्रकरणी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय सुनावलाय. यानुसार दिल्लीतील न्यायालयाने या प्रकरणातील दोषी दहशतवादी अरिझ खान याला थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी मोहन चंद शर्मा यांना खरी आदरांजली मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येतेय (What is Batla House Encounter Case and Court judgment on it).

पोलीस निरिक्षक मोहन चंद शर्मा यांनाच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बाटला हाऊस येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर नियोजनबद्ध कारवाई केली. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या बेछुट गोळीबारात शर्मा यांच्या पोटात, मांडीवर आणि उजव्या हातावर गोळ्या लागल्या आणि ते जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. शर्मा यांच्यावर गोळ्या झाडल्याप्रकरणी शहजाद अहमद या दहशतवाद्याला दोषी ठरवण्यात आलं.

“आरिज 19 सप्टेंबर 2008 रोजी आपल्या सहकाऱ्यांसोबत बाटला हाऊस येथे उपस्थित होता. त्यावेळी इन्सपेक्टर मोहन चंद शर्मा आणि हेड कॉन्स्टेबल बलवंत यांच्यावर जाणीवपूर्वक गोळ्या झाडल्या गेल्या. त्यामुळे आरिजला हत्येचा दोषी मानलं जात आहे.”, असा निकाल न्यायाधीशांनी घोषित केला.

न्यायाधीशांच्या अधिकाऱ्यांना सूचना

तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना न्यायाधीशांनी महत्त्वाची सूचना दिली. बाटला हाऊस एन्काउंटमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबावर किती परिणाम पडला, त्यांनी किती रुपये नुकसान भरपाई दिली जावी, आरिज त्यांना किती रुपये देऊ शकतो, यासंबंधित रिपोर्ट तयार करण्याचा आदेश न्यायाधीशांनी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला.

नेमकं प्रकरण काय?

13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीतील अनेक भागांमध्ये सिरियल बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात 26 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. तर 133 नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यामागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला 19 सप्टेंबर 2008 रोजी या हल्ल्याच्या कट रचणाऱ्या अतिरेक्यांसंबंधित महत्त्वाची माहिती मिळाली.

इंडियन मजाहिद्दीनचे 5 अतिरेकी दिल्लीतील बाटला हाऊस येथील बिल्डिंग L-18 च्या फ्लॅटमध्ये लपून बसले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या पाच अतिरेक्यांमध्ये आरिज खान, आतिफ अमीन, मोहम्मद साजिद, मोहम्मद सैफ आणि शहजाद अहमद यांचा समावेश होता. 13 सप्टेंबर 2008 रोजी इन्सपेक्टर मोहन चंद शर्मा जेव्हा आपली टीमला घेऊन बाटला हाऊसला पोहोचले तेव्हा पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत मोहन चंद शर्मा शहीद झाले. मोहन चंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी कोर्टाने याआधी शहजाद अहमदला दोषी घोषित करण्यात आलं आहे.

चकमक बनावट असल्याचाही आरोप, मात्र न्यायालयाचा निकाल पोलिसांच्या बाजूने

दरम्यान, 2008 मध्ये झालेल्या या चकमकीनंतर ही चकमक बनावट असल्याचा गंभीर आरोप दिल्ली पोलिसांवर झाला. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात खटलेही दाखल झाले. यानंतर उच्च न्यायालयाने न्यायालयीन चौकशी अमान्य केली. मात्र, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. आयोगाने आपल्या चौकशी अहवालात दिल्ली पोलिसांना क्लिनचीट दिली.

हेही वाचा :

शोपियां बनावट चकमकप्रकरणी आरोपपत्र दाखल, 3 आरोपींमध्ये सैन्यातील कॅप्टनचाही समावेश

“जुबी, न घाबरता सरेंडर कर बेटा” आईची विनवणी जुमानली नाही, तिघा दहशतवाद्यांना अखेर कंठस्नान

हत्येनंतर जाळण्यासाठी घराच्या समोरच 5 पोलिसांचे मृतदेह रचले, चौकशीत गँगस्टर दुबेची कबुली

व्हिडीओ पाहा :

What is Batla House Encounter Case and Court judgment on it

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.