नवी दिल्लीः ग्रीन ग्रोथ (Green Growth) आणि ग्रीन हायड्रोजन (Hydrogen) मिशनप्रमाणेच भारताने (India) आता आणखी एक मिशन हाती घेतलंय. ग्रीन रेल्वे मिशन. यात फक्त रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन म्हणजेच वीजेवर चालणाऱ्या रेल्वे गाड्यांचा समावेश होतो, एवढंच नाहीये. तर त्यापेक्षाही आणखी विविध पैलूंनी पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने अभ्यास करून तसे उपाय योजण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2023-24 च्या बजेटमध्ये याविषयी उल्लेख केला.
भारतीय रेल्वे पर्यावरण संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या कृती रेल्वे विभागाकडून केल्या जाणार नाहीत. किंवा त्या बंद करून पर्यायी व्यवस्था केली जाईल. त्यामुळे भविष्यात भारत ग्रीन रेल्वे असलेला जगातील पहिला देश ठरेल, असे म्हटले जात आहे.
१- झीरो कार्बन उत्सर्जनः भारतीय रेल्वेने 2020 पर्यंत झीरो कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार केंद्र सरकारतर्फे उपाययोजना सुरु आहेत. ट्रेनमध्ये हेड ऑन जनरेशन सिस्टिम, बायो टॉयलेट आणि एलईडी वापराद्वारे ट्रेन पर्यावरणासाठी अनुकूल बनवल्या जात आहेत.
2.पर्यावरण पूरकः सरकारी कार्यालयांमध्ये कागदांचा वापर अत्यंत कमी, नसल्यातच जमा आहे. रेल्वेमुळे जंगली प्राण्यांना धोका पोहोचू नये, यासाठी रेल्वे लाइनभोवतीचे फेंसिंग वाढवण्यात येणार आहे. या प्रयत्नांसाठी सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम रेटिंगसह ग्रीन सर्टिफिकेट मिळाले आहेत.
3- विद्युतीकरण 10 पटींनी वाढलं- 2022 नंतर रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन 10 पटींनी वाढलं आहे. आता बहुतांश ट्रेन डिझेल ऐवजी वीजेवर चालतात. त्यामुळे प्रदूषण कमी होतं. डिसेंबर 2023 पर्यंत ब्रॉड गेज लाइनचे 100 टक्के विद्युतीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे.
4. रेल्वे स्टेशन्सना मानांकन- पर्यावरण पूरक धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातील शेकडो स्टेशनांना आयएसओ मानांकन दिलं जातंय. वीज बचत, सौर ऊर्जा, जलसंरक्षण, कचरा व्यवस्थापन असे उपक्रम राबवणाऱ्या स्टेशन्सला गौरवण्यात येतंय.
5- अक्षय ऊर्जेवर भर- भारतीय रेल्वेने तमिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये 200 मेगावॉट क्षमतेचं पवन ऊर्जा संयंत्र स्थापन करणे तसेच त्याला प्रोत्साहन देण्याची योजना तयार केली आहे. रुफटॉप सोलर पॅनलच्या माध्यमातूनही 500 मेगा वॉट ऊर्जा निर्मिती करण्यावर सरकार काम करत आहे.