चंद्रयान-3 आणि आदित्य एल-1 नंतर अंतराळात भारताची पुढची योजना काय? ISRO प्रमुख सोमनाथ यांनी स्पष्ट केले की…
भारताने चांद्रयान-3 मोहिमेत चंद्राच्या दक्षिण धुव्रावर लॅंडींग करण्याचा पराक्रम केल्यानंतर आता इस्रोचे आदित्य - एल - 1 देखील सुर्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या नियोजित एल-1 बिंदू पर्यंत चार महिन्यांचा प्रवास करीत पोहचले आहे. भारताची सुर्याचा अभ्यास करणारी ही पहिली अंतराळ प्रयोगशाळा कक्षेत स्थिरावली आहे. 15 लाख किमी अंतर कापल्यावर हे यश मिळाले आहे. यानंतर आता इस्रोची काय योजना आहे ? याविषयी इस्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी माहीती दिली आहे.
बंगळुरु | 7 जानेवारी 2024 : भारताने चांद्रयान-3 मोहिमेत दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे चांद्रयान-3 उतरवून चमत्कार केला. त्यानंतर सुर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेले आदित्य – एल – 1 आता यशस्वीपणे त्यांच्या लॅंग्रेज पॉईंट – 1 वर पोहचविण्यात भारताला यश आले आहे. आता आदित्य एल-1 ची देखभाल आणि त्याच्या ऑर्बिट ओरिएंटेशनवर लक्ष ठेवले जात आहे. आम्ही आश्वस्थ होतो. सर्वकाही योजनेबरहुकुम झाले. आता आम्ही आनंदी आहोत. आम्ही आता यानाची देखभाल आणि ऑर्बिट ओरिएंटेशनच्या दिशेवर तप्तर रहाणार आहे. L-1 वर अन्य सॅटेलाईट देखील आहेत, परंतू आपला सॅटेलाईट अधिक अद्वितीय आणि अत्याधुनिक आहे, असे एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो आता अन्य कोणते उपक्रम हाती घेणार आहे याबद्दलही त्यांनी यावेळी माहीती दिली आहे.
भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो हीचे या सौर मिशनच्या यशानंतर सर्व लक्ष भारताच्या मानव अंतराळ उड्डाण कार्यक्रम गगनयानवर लागले आहे. आम्ही आमच्या मोकळ्या वेळेत एनआयएसएआर ( नासा- इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार मिशन ) आणि अन्य योजनांवर काम करणार आहे. आज आम्ही जे यश मिळविले आहे, त्यामुळे अधिक योग्य जागी प्लेसमेंट आणि वेगावर नियंत्रण मिळवून केले आहे. तरी आम्ही आणखी काही तास आदित्य एल-1 योग्य जागी सेट झाले आहे का याची पाहणी करीत रहाणार आहोत. आमच्या गणनेनूसार ते योग्य जागेवर गेले आहे. तरी आम्हाला काही तास वाट पहावी लागणार आहे. ते योग्य पॉईंटवर गेले की नाही याची पाहणी करावी लागणार आहे.
आदित्य एल-1 सूर्याचा अभ्यास करणारी भारताची अंतराळातील पहिली एक प्रकारची वेधशाळा आहे. त्याचा एल-1 बिंदू पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किमी अंतरावर आहे. येथून आदित्य एल-1 सुर्याची प्रदक्षिणा घालणार आहे. आणि सूर्यावर सतत लक्ष्य ठेवून त्याच्या चमत्कारीक शक्तीचा अभ्यास करणार आहे. सौर हालचाली आणि अंतराळातील हवामानाचा प्रभावाचा देखील अभ्यास आदित्य एल-1 यान करणार आहे.
पंतप्रधानांनी केले कौतूक
आदित्य एल-1 चा हेलो- ऑर्बिट इंसर्शन ( एचओआय ) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पूर्ण केला जाईल. अंतिम टप्प्यात थोड्या काळासाठी नियंत्रित इंजिनांचे फायर करावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इस्रोच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. चंद्रयान -3 च्या यशानंतर हे यश मिळाले आहे. आदित्य एल-1 हेलो कक्षेकडे चालला होता. परंतू आम्हाला त्याला योग्य कक्षेत ठेवण्यासाठी थोडी सुधारणा करावी लागली आहे. उपग्रहाला योग्य दिशेत राखण्यासाठी त्याला 31 मीटर प्रति सेंकदाचा वेग द्यावा लागणार असल्याचे सोमनाथ यांनी म्हटले आहे.