नागर शैली म्हणजे काय? राम मंदिराचे बांधकाम नागर शैलीतील आहे, देशात कोणकोणत्या शैलीतील मंदिरे आहेत?

अयोध्येतील भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम नागर शैलीतील आहे. उत्तर भारतातील ही स्थापत्य शैली देशात प्रसिद्ध असून तिचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. या मंदिराचे बांधकाम वेगळ्या पद्धतीने होत असते. ही शैली हिमालयापासून विंध्य पर्वतापर्यंत पाहायला मिळते. तर पाहूयात नागर शैली आणि इतर शैलींच्या मंदिराची माहीती....

नागर शैली म्हणजे काय? राम मंदिराचे बांधकाम नागर शैलीतील आहे, देशात कोणकोणत्या शैलीतील मंदिरे आहेत?
nagara style templeImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 7:23 PM

नवी दिल्ली | 20 जानेवारी 2024 : येत्या 22 जानेवारीला अयोध्यानगरीत राम मंदिराची भव्य प्रतिष्ठापना होणार आहे. या राम मंदिराचे बांधकाम नागर शैलीतील आहे. नागर शैली ही उत्तर भारतीय शैली असून भारताची प्राचीन स्थापत्यशैली आहे. भारतातील मंदिरांची विविध शैलीतील बांधकामे प्रसिध्द आहेत. उत्तर भारतातील मंदिरे नागर शैलीतील असल्याचे म्हटले जाते. तर दक्षिण भारतातील मंदिर द्राविडी शैलीतील आहेत. अयोध्येतील मंदिर नागर शैलीतील असून त्यासाठी लोखंड किंवा स्टीलचा वापर केलेला नाही. याच्या पायासाठी विशेष वस्तूंचा वापर केला आहे. ही नागर शैलीतील मंदिराचे वैशिष्ट्ये खूपच वेगळे असते. पाहूयात नागर शैली आणि इतर शैलीतील मंदिरे कशी असतात ते….

अयोध्येतील राम मंदिर हे देखील नागर शैलीतील बांधकाम आहे. या मंदिराचे डीझाईन गुजरात येथील सोमपुरा फॅमिलीने केले आहे. या मंदिराचा संपूर्ण नकाशा नागर शैलीचे वैशिष्ट्ये दर्शवितो. वास्तविक नागर शैली उत्तर भारतीय हिंदू स्थापत्य कलेच्या तीन शैली पैकी एक आहे. एवढेच नव्हे तर या शैलीतील मंदिरासाठी राजस्थानच्या बंसी पहाडपूर येथील दगडांचा वापर केला गेला आहे. राम मंदिरात रामाची बाल रुपातील मंदिराची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

नागर शैलीतील प्रमुख मंदिरे

कोणार्क येथील जगप्रसिद्ध सूर्य मंदिर, गुजरातच्या मोढेरा येथील सूर्य मंदिर तसेच गुजरातमधीलच ओसियन मंदिर ही भारतातील नागर शैलीत बांधलेल्या काही खास मंदिरांपैकी एक आहेत. खजुराहोचे कंदरिया महादेव मंदिर, भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर, पुरीचे जगन्नाथ मंदिर ही देखील नागर शैलीत बांधली गेली आहेत आणि त्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.

नागर शैली म्हणजे काय ?

नागर शब्दाची उत्पत्ती नगर या शब्दापासून झाली आहे. ही प्रामुख्याने 5 व्या ते 7 व्या शतकातील शैली आहे. नागर शैली पल्लव काळात सुरु झाली आणि चोल काळात या शैलीतील मंदिराचे निर्मिती खूप झाली. या शैलीतील मंदिरे हिमालयापासून ते विंध्यपर्वतापर्यंत पाहायला मिळतात. वास्तूशास्रनूसार नागर शैलीतील मंदिरांची ओळख पायापासून कळसापर्यंत असलेल्या त्यांचा चतुष्कोणी आकार असतो. उत्तर भारतामध्ये बहुतांशी मंदिरे दगडी चबूतऱ्यावर बांधली जातात. वर जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला जातो. या शैलीचे एक वैशिष्ट्ये म्हणजे ती चारही बाजूंनी बंदिस्त नसतात. होती. अशा प्रकाराच्या शैलीमध्ये गर्भगृह सदैव उंचीवर टावरखाली असते. या मंदिराच्या शिखरामध्ये कळस असतो.

भारतातील अन्य शैली

आपल्या देशातील मंदिरे तीन प्रकारच्या शैलीतील आहे. पहिली नागर, दुसरी द्रविड, तिसरी वेसार शैली. नागर शैलीतील मंदिरे विशेष करुन खुल्या मोकळ्या जागेत उभारली जातात. म्हणजे मंदिराच्या चारी बाजूला कोणतीही भिंत किंवा बंदिस्त जागा नसते. तर द्रविड शैलीतील मंदिरात चार भिंतीच्या आत बांधली जातात. यात प्रवेश करण्यासाठी भव्य द्वार असते. तर वेसार शैलीतील मंदिरे नागर आणि द्रविड यांचे मिश्रण असते.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.