गुजरात आणि दिल्लीच्या निवडणुका एकाचवेळी, पालिका की गुजरात?; अरविंद केजरीवाल अडकले

दिल्ली महानगरपालिकेत 250 जागा असून त्यापैकी 42 जागा अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

गुजरात आणि दिल्लीच्या निवडणुका एकाचवेळी, पालिका की गुजरात?; अरविंद केजरीवाल अडकले
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 5:47 PM

नवी दिल्लीः सध्या विविध राज्यातील निवडणुकांमुळे अनेकांचे लक्ष आता राजकारणाकडे लागले आहे. त्यातच गुजरात विधानसभा आणि दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसमोर आता पेच निर्माण झाला आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या संदर्भात निवडणूक आयुक्त विजय देव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, दिल्ली एमडीसी निवडणुका 4 डिसेंबर रोजी होणार आहेत. तर त्याचा निकाल 7 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळी 8 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. त्यामुळे आजपासूनच आचारसंहिता लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक प्रचाराचे होर्डिंग आणि बॅनरही काढले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी 7 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 14 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.

16 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर जाहीर करण्यात आली आहे.

दिल्लीत 70 जागा मात्र 2 जागांसाठी निवडणूक होणार नाही. या परिस्थितीत विधानसभेच्या 68 जागा असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणेच 250 प्रभाग असून त्यामधून येथे निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या निवडणुकीत 50 हजारांहून अधिक ईव्हीएम ठेवण्यात आले होते. तसेच या निवडणुकीत NOTA चाही वापर केला जाणार आहे.

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 1 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यामध्ये पोलिसांचाही सहभाग असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यांनी सांगितले की, निवडणुकीत 250 एआरओ असतील. २ हजार सेक्टर मॅजिस्ट्रेट असतील. 68 सामान्य निरीक्षक तैनात केले जाणार आहेत. निवडणुकीची जय्यत तयारी केली जात असून दिल्लीत आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे.

दिल्लीच्या या निवडणुकांमुळे पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्त आल्या आहेत. यापूर्वीच्या उमेदवारानी 5.75 लाख रुपयांपर्यंत खर्च केला होता, तर आता त्यात वाढ करण्यात आली असून उमेदवार 8 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकणार असल्याचे बोलले जात आहे..

दिल्ली महानगरपालिकेत 250 जागा असून त्यापैकी 42 जागा अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

दिल्ली महानगरपालिकेच्या प्रभागांच्या सीमांकनानंतर केंद्र सरकारने 18 ऑक्टोबर रोजी अधिसूचनाही जाहीर केल्या आहेत.

यापूर्वी दिल्ली महापालिकेत 272 जागा होत्या. पूर्वी उत्तर आणि दक्षिण महानगरपालिकेत 104-104 नगरसेवकांच्या जागा होत्या, तर पूर्व दिल्लीत 64 जागा होत्या, परंतु विलीनीकरण आणि सीमांकनानंतर, 250 जागा झाल्या आहेत.

दिल्लीतील 21 विधानसभा मतदारसंघात एक प्रभाग कमी झाला आहेत. त्यामुळे दिल्लीत दिल्लीत 250 वॉर्डांमध्ये नगरसेवकांच्या निवडणुका होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.