Aditya L-1 : 615 कोटी रुपयांत चंद्रयान-3 चंद्रावर पोहचले, आता सुर्याला गवसणीसाठी किती खर्च ?

साल 2008 मध्ये इस्रोने सूर्ययान मोहिमेचा विचार केला होता. परंतू बजेट पुरेसे नसल्याने ती थांबविण्यात आली. चंद्रयान-3 च्या यशानंतर आदित्य मिशनचा मार्ग मोकळा झाला आहे.

Aditya L-1 : 615 कोटी रुपयांत चंद्रयान-3 चंद्रावर पोहचले, आता सुर्याला गवसणीसाठी किती खर्च ?
aditya L1Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 2:13 PM

नवी दिल्ली | 28 ऑगस्ट 2023 : चंद्रयान-3 च्या यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो सूर्यावर जाण्याची तयारी करीत आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने लागलीच आपले दुसरे मिशन पोतडी बाहेर काढले आहे. इस्रोच्या सुर्य माहिमेचे नाव ‘आदित्य एल-1’ असे ठेवण्यात आले आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी भारत आपल्या सुर्य मोहिमेचे लॉंचिंग करणार आहे. चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सफल लॅंडींग केल्यानंतर त्याच्या बजेटची चर्चा झाली. इतक्या कमी बजेटमध्ये भारताने करुन दाखविलेल्या सॉफ्ट लॅंडींगला जग सलाम करीत आहे. त्यामुळे सूर्ययान मोहीमेचा खर्च किती येणार असा सवाल केला जात आहे.

साल 2008 मध्ये इस्रोने सूर्ययान मोहिमेचा विचार केला होता. परंतू बजेट पुरेसे नसल्याने ती थांबविण्यात आली. चंद्रयान-3 च्या यशानंतर आदित्य मिशनचा मार्ग मोकळा झाला आहे. या मोहिमेसाठी रॉकेट लॉंचिंग खर्च वगळता केवळ 378.53 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जर लॉंचिंगचा खर्च जमेस धरल्यास या खर्चात वाढ होईल. आदित्य एल-1 या नावातील एल-1 हा एल-1 लग्रॅज पॉईंट 1 दर्शवित आहे. पृथ्वी आणि सुर्या दरम्यानचा दोन महत्वपूर्ण बिंदूपैकी हा एक बिंदू आहे.

15 लाख किलोमीटर दूर

हा बिंदू पृथ्वीपासून तब्बल 15 लाख किलोमीटर दूर आहे. या बिंदूवर यान जाणार असून सूर्याची माहीती मिळणार आहे. या सुर्य मोहीमेत या L1 बिंदूवर म्हणजे लॅंग्रेज पॉईंटवर पोहचण्यासाठी 109 दिवस लागणार आहे. चंद्रयान-3 ला चंद्रावर पोहचण्यासाठी केवळ 615 कोटी रुपयांचा खर्च आला होता. यापेक्षाही अर्ध्या खर्चात भारत सुर्याची मोहीम राबविणार आहे.

सुर्य मोहीमेचा फायदा काय ?

चंद्रयान-3 नंतर भारत अंतराळात आणखी एक इतिहास रचण्याची तयारी करीत आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी भारताचे आदित्य एल-1 मोहीम लॉंच करण्यात येणार आहे. चंद्रयान-3 पेक्षाही त्याचा खर्च जवळपास निम्मा आहे. जर ही मोहीम यशस्वी झाली तर अमेरिका, जर्मनी, युरोप आणि चीन यांच्या रांगेत भारताला स्थान मिळणार आहे. इस्रोच्या या सुर्य मोहीमेमुळे सुर्याची महत्वाची माहीती मिळण्यास इस्रोला मदत मिळणार आहे. सुर्यावरील चुंबकीय वादळे, पृथ्वीवर त्याचा होणारा परिणाम यासंदर्भात माहीती मिळविण्याचा प्रयत्न होणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.